शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

सख्ख्या भावांसाठी दोन डमींनी दिली परीक्षा

By admin | Updated: April 16, 2016 02:12 IST

रत्नागिरीत झालेल्या पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेत दोन सख्ख्या भावांसाठी दोन डमी उमेदवारांनी लेखी परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. डमी म्हणून बसलेल्या दोघांसह एकूण सात

रत्नागिरी : रत्नागिरीत झालेल्या पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेत दोन सख्ख्या भावांसाठी दोन डमी उमेदवारांनी लेखी परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. डमी म्हणून बसलेल्या दोघांसह एकूण सात जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून, त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सात जणांमध्ये औरंगाबाद येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांमध्ये डमी उमेदवार म्हणून लेखी परीक्षा देणारे विठ्ठल त्र्यंबक शिसोदे ऊर्फ माऊली (वय २१) व पवण सांडू कवाळे (२१, दोघेही रा. निहालसिंगवाडी, पो. रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना), शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेले (ज्यांनी लेखी परीक्षा देणे अपेक्षित होते ते) उमेदवार विशाल अशोक शिंदे (२५) व उमेश अशोक शिंदे (२१, दोघेही रा. सागवण, उल्हास चौक, जिल्हा बुलडाणा) व या गुन्ह्यास सहकार्य करणारे विनोद रामसिंग माळी (३२, रा. वाळुंज-औरंगाबाद), नवनाथ गंगाधर चव्हाण, (२८, रा. भडगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) व पोलीस कॉन्स्टेबल पूनमसिंग हरसिंग सुंदरडे (२९, रा. पोलीस मुख्यालय, औरंगाबाद, मूळ रा. अंबड, जालना) यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे रत्नागिरी येथे लेखी चाचणी घेतली. (प्रतिनिधी)