शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खामकरला दोन दिवसांची कोठडी

By admin | Updated: August 6, 2014 01:40 IST

नायब तहसीलदार सुहास खामकर व गणोश खोगाडे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अलिबाग :  पन्नास हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पनवेल येथे अटक केलेला शरीरसौष्ठव स्पर्धेतील मिस्टर इंडिया व पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर व त्याच्या कार्यालयातील लिपिक गणोश खोगाडे यांना मंगळवारी येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता या दोघांनाही दोन दिवस (7 ऑगस्टर्पयत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायाधीश एच.ए. पाटील यांनी दिले आहेत.
नायब तहसीलदार सुहास खामकर याने लिपिक गणोश खोगाडे याच्या माध्यमातून लाच घेतली आहे. यासंदर्भातील मोबाइलवरील संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका:यांनी ध्वनिमुद्रित केले आहे. आवाजाची खातरजमा व अन्य तपासासाठी खामकर व खोगाडे या दोघांनाही किमान आठ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी न्यायालयाकडे केली.
दरम्यान, लाचेची रक्कम थेट नायब तहसीलदार सुहास खामकर यांनी स्वीकारलेली नाही. त्याचबरोबर सातबा:यावर नावाच्या नोंदी करण्याचे काम नायब तहसीलदार यांचे नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या सापळ्यात नायब तहसीलदार सुहास खामकर यांना गोवण्याचे हे कारस्थान आहे. तपासाच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही तपास अधिका:यांनी पूर्ण केलेली असताना आता खामकर यांना पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन नायब तहसीलदार सुहास खामकर यांचे वकील अॅड. प्रवीण ठाकूर यांनी न्यायालयात केले.
उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायालयाने दोघाही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, आज दुपारपासूनच पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर याच्या सहकारी शरीरसौष्ठवपटूंनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. तर सरकारी यंत्रणोतदेखील आजच्या या सुनावणीबाबत मोठी औत्सुक्य होते. (विशेष प्रतिनिधी )