शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणी महापालिका लिपिक कावळेला दोन दिवसांची कोठडी

By admin | Updated: July 15, 2016 21:20 IST

महापालिकेतील बांधकामांच्या ठेक्यापोटी भरलेली मुदतठेव परत करण्यासाठी ठेकेदाराकडून ३३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून २० हजार रुपये स्वीकारताना सापळा रचून अटक

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 15 - महापालिकेतील बांधकामांच्या ठेक्यापोटी भरलेली मुदतठेव परत करण्यासाठी ठेकेदाराकडून ३३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून २० हजार रुपये स्वीकारताना सापळा रचून अटक करण्यात आलेले वरिष्ठ लिपिक संशयित शेखर निवृत्ती कावळे (५४) यांस एसीबी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एऩ के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी (दि़ १५) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यामध्ये सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी न्यायालयात केला.महापालिकेच्या बांधकाम विभागात वरिष्ठ लिपिक असलेले व सद्यस्थितीत नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागात बदली झालेले संशयित शेखर कावळे यांना गुरुवारी (दि़ १४) चार वाजेच्या सुमारास ठेकेदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर अटक करण्यात आली होती़ शुक्रवारी त्यांना एसीबीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले़ यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी न्यायालयात कावळे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली़. सरकारी वकील निंबाळकर यांनी न्यायालयास सांगितले की, पंचनाम्यामध्ये साहेबांना दोन टक्के प्रमाणे पैसे द्यावे लागतील, असे म्हटले असून या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. तसेच सापळ्यानंतर तपासी यंत्रणेने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल होते़ वरिष्ठ लिपिक कावळेंची ५ मे २०१६ रोजी नाशिकरोडला बदली करण्यात आली त्याठिकाणी ते हजरही झाले; मात्र तरीही ते बांधकाम विभागातच काम कसे काय करीत होते याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे तपास करणे आवश्यक आहे़ महापालिकेच्या बांधकाम विभागात ठेकेदारांच्या बिलांच्या व्यवहारामध्ये कावळेंची भूमिका महत्त्वाची असून त्याचा योग्य तपास होणे गरजेचे आहे़ याबरोबरच आवाजाचे नमुने, पंचनामा, कागदावर दिलेले पैशांचे विवरण व मागणी केल्यामुळे हस्ताक्षर नमुना तसेच संशयित कावळेंच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी़. सरकारी वकील व आरोपीच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश ब्रह्मे यांनी संशयित शेखर कावळे यांना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़.