शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

दोन सिलिंडर; यापुढे केरोसीन रद्द

By admin | Updated: May 18, 2016 01:24 IST

सर्व शिधापत्रिकाधारकांना केरोसीन मिळणार नसल्याची माहिती हवेलीच्या पुरवठा अधिकारी तेजस्विनी पारखी यांनी दिली

लोणी काळभोर : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी २० आॅगस्ट २०१५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ज्यांच्याकडे एक किंवा दोन गॅसजोडण्या आहेत व सिलिंडर सवलतीच्या दरात मिळतात, अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना केरोसीन मिळणार नसल्याची माहिती हवेलीच्या पुरवठा अधिकारी तेजस्विनी पारखी यांनी दिली.पूर्वी सर्व शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात रॉकेल मिळत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते मिळत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी पसरली आहे. स्वस्त धान्य वितरीत करणारे दुकानदार व शिधापत्रिकाधारकांमध्ये यामुळे वाद होत आहेत. पारखी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागाकरिता केरोसिन वितरण राज्य शासनाने जून १९९७ पासून निश्चित केलेले आहे. या परिणामामुळे ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांवर अन्याय होत आहे. दोन्ही भागांकरिता समान परिमाण ठरवावे यासाठी अशा आशयाची रिट याचिका आदर्श बालविकास मंडळ नागपूर या संस्थेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केली होती. यासंदर्भात न्यायालयाने २९ जून २००० रोजी गरीब जनता मुख्यत्वे ग्रामीण भागांत राहात असल्याने त्यांना केरोसिनची गरज जास्त आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण व शहरी भागाकरिता केरोसिनचे समान परिमाण ठरवण्याबाबत पुनर्विचार करावा, असे आदेश दिले होते.याबाबत विचार करून शासनाने ३१ मार्च २००० अन्वये ग्रामीण व शहरी भागाकरिता केरोसिनचे समान परिमाण निश्चित करून या निर्णयाची अंमलबजावणी १ मे २००१ पासून करण्यात आली. यामुळे शहरी भागातील मुख्यत्वे मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील बिगर गॅसधारक शिधापत्रिकाधारकांना परिमाणात कपात झाल्यामुळे या क्षेत्रात मे २००१ पूर्वीचेच परिमाण लागू करावे अशा स्वरूपाची निवेदने अनेक लोकप्रतिनीधींनी शासनास दिली असल्याने ग्रामीण व शहरी भागाकरिता निश्चित केलेले केरोसिनचे समान परिमाण रद्द करून मे २००१ पूर्वी असलेले परिमाण लागू करण्याचा निर्णय शासन निर्णय ८ जून २००१ अन्वये घेण्यात आला. शासनाने सध्या विहित केलेल्या केरोसिन परिमाणानुसार केरोसिन मिळत नसल्याने २०१४ मध्ये खंडूजी देवबा पुंड यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केरोसिन वितरण बाबतच्या परिमाणाचे सुधारित धोरण ठरवणे आवश्यक झाले होते.शहरी व ग्रामीण भागांसाठी वेगवेगळे असलेले केरोसिन वाटपाचे परिमाण रद्द करून आता शहरी व ग्रामीण भागांतील शिधापत्रिकाधारकांसाठी एकरूप परिमाण निश्चित करण्यात आले असून, सदर परिमाण राज्यास केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या केरोसिन नियतनाच्या अधिन राहणार आहे. राज्यातील एक किंवा दोन गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात मिळतात, अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना प्रतिवर्षी बारा सिलिंडर सवलतीच्या दरात मिळतात, त्यांना यापुढील काळात शिधापत्रिकेवर केरोसिन मिळणार नाही. परंतु ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडणी नाही अशा बिगर गॅसधारक शिधापत्रिकाधारकांना एक व्यक्ती दोन लिटर, दोन व्यक्ती तीन लिटर, तीन वा त्याहून अधिक व्यक्तींना चार लिटर केरोसिन मिळणार आहे. (वार्ताहर)>केरोसीनची चढ्या दराने विक्रीगॅसधारक शिधापत्रिकाधारकांना केरोसिन मिळणार नाही, हा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना केरोसीन कधी येते व संपते, याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने याचा फायदा पुरवठा करणारे दुकानदार उठवतात व ते हे केरोसीन सुमारे ८० ते १०० अशा चढ्या दराने विकून मालामाल होतात, याकडे पुरवठा विभागाचे अधिकारी दुर्लक्ष का करतात? असा सवाल सर्वसामान्य करीत आहेत.