शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दोन कोटींची मदत

By admin | Updated: May 8, 2017 04:41 IST

खासदार संजय काकडे आणि उषा काकडे यांच्या कन्या कोमल हिचा विवाह, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांचे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खासदार संजय काकडे आणि उषा काकडे यांच्या कन्या कोमल हिचा विवाह, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन यांच्याशी रविवारी पुण्यात थाटात झाला़ या लग्नासाठी झालेल्या खर्चाइतका २ कोटी रुपयांचा निधी संजय काकडे आणि सुभाष देशमुख यांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिला आहे.उभय कुटुंबीयांनी ‘रोहन-कोमल शिक्षण योजना’ हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून, २ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला़ या प्रसंगी ‘लोकमत’ मीडिया प्ऱा़ लि़चे चेअरमन विजय दर्डा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उद्योजक सूर्यकांत काकडे आदी उपस्थित होते़ या विवाह सोहळ्याला राजकीय, सामाजिक, उद्योग, व्यापार क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते़याबाबत संजय काकडे यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असूनदेखील, केवळ आर्थिक अडचणीमुळे ते पुढील शिक्षण घेऊ शकत नाही़त.ज्या दिवशी आमची सोयरीक जुळली़ त्याच दिवशी मुला-मुलींसाठी एक अनोखी भेट द्यावी, असे ठरवले़ लग्नासाठी जो खर्च येईल, तेवढाच निधी देऊन, आम्ही आमची सामाजिक बांधिलकी म्हणून ‘रोहन-कोमल शिक्षण योजना’ राबवित आहोत़ या योजनेसाठी २ कोटी रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्र्द करीत आहोत़ याच्या व्याजातून किमान १०० विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे़ या गरजू विद्यार्थ्यांची निवड ७ मे ते ७ जून या दरम्यान आमच्याकडे येणाऱ्या अर्जांतून केली जाणार आहे. किमान १०० विद्यार्थी निवडले जातील़ निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत मदत करण्यात येईल़ चालू वर्षासाठी आणखी २५ लाख रुपये वेगळे दिले जातील़ इतरांनाही मदत करायची असल्यास, या २ कोटी रुपयांमध्ये पैसे जमा करावेत, म्हणजे आणखी जास्त विद्यार्थ्यांना मदत मिळू शकेल, असे आवाहन संजय काकडे यांनी केले आहे़