शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात दोन कोटींचा दरोडा

By admin | Updated: June 19, 2016 00:35 IST

‘तुमच्या व्हॅनमध्ये ड्रग्ज आहेत, आम्ही पोलिस आहोत’ अशी बतावणी करून एका व्हॅनसह ६१५ किलो चांदी, दीड तोळ्याचे सोन्याचे नवीन दागिने, २८ किलो तांब्याच्या धातूचे मणी असा

कोल्हापूर : ‘तुमच्या व्हॅनमध्ये ड्रग्ज आहेत, आम्ही पोलिस आहोत’ अशी बतावणी करून एका व्हॅनसह ६१५ किलो चांदी, दीड तोळ्याचे सोन्याचे नवीन दागिने, २८ किलो तांब्याच्या धातूचे मणी असा सुमारे दोन कोटी २१ लाख ५९ हजार २२० रुपयांचा दरोडा टाकल्याची घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे घडली. पोलिसांच्या चपळाईमुळे अवघ्या चार तासांत दरोड्यातील माल हस्तगत करण्यात यश आले. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘कोल्हापुरातील महाद्वार रोड लागून असलेल्या भेंडे गल्लीत साईनाथ एक्सप्रेस सर्व्हिस या कुरिअर सर्व्हिस कंपनीत व्यवस्थापक म्हणून राजकिशोर मास्टर परमार (वय ३०, सध्या राहणार शिवाजी चौक, कोल्हापूर) हे काम पाहतात. याठिकाणी योगेश शर्मा, सुनील परमार, संदीप तोमर, भोले राजाबथ , अंकित परमार हे कामगार आहेत. या कंपनीच्या कोल्हापूर, मुंबई, मालाड, भोलेश्वर, बडोदा, सुरत, अहमदाबाद, राजकोट, दिल्ली, उदयपूर या शहरांमध्ये शाखा आहेत. कोल्हापूरच्या सराफ बाजारपेठेमधून आॅर्डरप्रमाणे माल घेऊन त्याच्या पार्सलचे काम या कंपनीकडून केले जाते. त्यामध्ये चांदी, सोन्याचे ऐवज असा माल असतो. यासाठी कंपनीची व्हॅन (एमएच ०९ -एयू-४८९१) वापरली जाते. शुक्रवारी रात्री कोल्हापुरातील ५९ सराफ व्यावसायिकांचे सोन्या-चांदीचे दागिने, ऐवज आणि कामगार योगेश शर्मा व सुनील परमार अशा दोघांना घेऊन चालक तुषार नाईक भेंडे गल्लीतून व्हॅनमधून निघाले. त्यांच्या व्हॅनपाठोपाठ दुचाकीवरून संदीप तोमर, भोले राजाबथ हे दोघे कामगार येत होते. त्यांची व्हॅन शासकीय विश्रामगृहाजवळ आल्यावर चौघेजण एका कारमधून (एमएच ९१९५) व्हॅनजवळ आले. त्यांनी चालक नाईक, योगेश शर्मा व सुनील परमार यांना खाली उतरवले. ‘आम्ही पोलिस आहोत, तुमच्या व्हॅनमध्ये ड्रग्ज आहेत’ असे सांगून या तिघांना त्या अज्ञातांनी आपल्या कारमध्ये बसविले. याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून येणारे कामगार संदीप तोमर व भोले राजाबथ यांना हा प्रकार दिसला. त्यांनी व्यवस्थापक राजकिशोर परमार यांना हा प्रकार सांगितला. राजकिशोर यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविला. (प्रतिनिधी)