शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरकर्मा पित्याने छाटली दोन चिमुरड्यांची मुंडकी

By admin | Updated: October 31, 2016 19:20 IST

ऐन दिवाळीच्या दिवशी पोटच्या दोन चिमुकल्यांना शेतात नेऊन अत्यंत क्रूरपणे त्यांची मुंडकी कुऱ्हाडीने धडावेगळी करून हत्या केली.

ऑनलाइन लोकमत अमरावती, दि. 31 -  ऐन दिवाळीच्या दिवशी पोटच्या दोन चिमुकल्यांना शेतात नेऊन अत्यंत क्रूरपणे त्यांची मुंडकी कुऱ्हाडीने धडावेगळी करून हत्या केली.  इवल्याशा त्या बालकांचे मृतदेह ३०० फूट खोल दरीत फेकून हा क्रुरकर्मा पसार झाला. ही घटना चिखलदरा तालुक्यातील खडीमल येथे रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. घटना उघड झाल्यानंतर पाहणाऱ्यांच्या अंगाचा अक्षरश: थरकाप उडाला. सुधाकर भाऊ सावलकर (३०, रा. खडीमल) असे क्रूरकर्मा पित्याचे नाव असून आकाश सुधाकर सावलकर (१०) व आतिष सुधाकर सावलकर (८) अशी मृत चिमुरड्यांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर सावलकर याने दिवाळीच्या दिवशी (रविवारी) २.३० वाजता पोटच्या दोेन्ही गोळ्यांना शेतात नेले. तेथे कुऱ्हाडीने त्यांचे मुंडके छाटून त्यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने दोघांचेही मृतदेह डोलारदेव जंगल खंड क्रमांक २९४ अंतर्गत खडीमल गावाच्या पूर्वेला असलेल्या ३०० फूट खोल दरीत नेऊन टाकले. घटनेचा सुगावा लागू नये म्हणून त्याने दोन्ही मुलांचे मृतदेह झाडांच्या फांद्यांनी झाकून लपवून ठेवले होते.  आईला नव्हता थांगपत्ता-सुधाकर सावलकरची पत्नी व मोठी मुलगी दोघीही दिवाळीच्या कामांमध्ये रविवारी व्यस्त होत्या. रविवारी सायंकाळी ६ वाजता सुधाकर मुलांना न घेता एकटाच शेतातून परतला. सुधाकरच्या पत्नीने त्याला मुले कुठे आहेत, याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने मुले शेतात असल्याची थाप मारून वेळ मारून नेली. मात्र, सायंकाळी ७ वाजल्यानंतरही मुले शेतातून न परतल्याने सुधाकरची पत्नी, वडील व भावासह शेतात गेली. मात्र, तिथे तिला मुले आढळली नाहीत. पुन्हा सुधाकरला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा शेतातील ज्वारीच्या पिकामध्येच मुलांचा शोध सुरू केला. पश्चात सुधाकरला दमदाटी करून विचारणा केली असता त्याने ‘मुले देवाघरी गेली’ या शब्दांत बोळवण करून घटनास्थळावरून पळ काढला. गावकऱ्यांची रात्रभर शोधमोहीम-सुधाकरने मुलांना बेपत्ता केल्याची माहिती गावात पसरताच २०० च्या वर गावकऱ्यांनी एकत्र येऊन अख्खी रात्र काढून जंगल पिंजून काढले. मात्र, मुलांचा काहीही पत्ता लागला नाही. सोमवारी पहाटेपासून पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. डोंगरदेव जंगलानजीक दरीत काही लोक उतरले असता त्यांना दोन्ही मुलांचे शव आपट्याच्या पानांखाली लपवून ठेवल्याचे दिसून आले. निर्दयी पिता फरार -रविवारी दुपारी दोन्ही मुलांची निर्दयीपणे हत्या करून सुधाकर बेपत्ता झाला आहे. तो सहा महिन्यांपासून विमनस्क अवस्थेत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. घटनेची माहिती चिखलदरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चुर्णी येथील ग्रामीण रूग्णालयात रवाना केले. पोलीस सुधाकरचा शोध घेत आहेत. दरम्यान एका मुलाच्या अंगावर ‘डंबे’ (गरम विळ्याचे चटके) दिल्याच्या खुणा आढळल्याने हा प्रकार अंधश्रद्धेतून तर घडला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहेत.