शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मदरशातील दोन मुले बेपत्ता, पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 14:37 IST

नंदनवनमधील एका मदरशातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शोएब (वय ११ वर्ष) आणि रेहान

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 25 - नंदनवनमधील एका मदरशातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शोएब (वय ११ वर्ष) आणि रेहान (वय ९ वर्षे) अशी बेपत्ता बालकांची नावे असून ते सख्खे भाऊ आहेत. ते पळून गेले की त्यांचे कुणी अपहरण केले, त्याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब आणि रेहान बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे रहिवासी आहेत. त्यांना वडील नाही. घरची स्थिती जेमतेम असल्याने त्यांच्या आईला त्रास होत असल्याचे पाहून पारशिवनी (भोपाळ) येथील एका नातेवाईकाने त्यांना नागपूरच्या मदरशात शिकायला ठेवण्याचा निर्णय घेतला. मुलांना मात्र ते नको होते. आईला सोडून दुसरीकडे राहण्यास ते तयार नव्हते. तरीसुद्धा नातेवाईकाने २० डिसेंबरला त्यांना नंदनवनमधील शारदा नगर (खरबी) येथील मदरशात आणून सोडले. ते येथे राहायला तयार नसल्याचे पाहून त्यांचा दाखला (अ‍ॅडमिशन) करण्याचे टाळण्यात आले. ८ ते १० दिवस ठेवून बघायचे, त्यांचे मन लागले तर त्यांचा मदरशात दाखला करायचा अन्यथा त्यांना गावाला पोहचवून द्यायचे, असा विचार करून नातेवाईक निघून गेला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास शोएब आणि रेहान मदरशातून बेपत्ता झाले.  ते गावातही पोहचले नाहीदोन तासानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर मदरशातील शिक्षक हाफीज अनवर कमाउद्दीन शेख (वय २२, रा. जामा मश्जिद, बाराशिवनी) यांनी नातेवाईकाला कळविले. दिवसभर शोधाशोध केल्यानंतर हाफिज यांनी शनिवारी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एस. राऊत यांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला. प्राथमिक चौकशीत हे दोघे त्यांच्या गावालाही पोहचले नसल्याचे उघड झाले. या दोघांचा शोध घेतला जात आहे.