शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे केरळची दोन मुले परतली घरी

By admin | Updated: March 19, 2017 01:09 IST

केरळमधून गायब झालेल्या दोन मुलांचा महिन्याभरापासून सुरु असलेला शोध अखेर संपला. मुंबई रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलांना कुर्ला रेल्वे टर्मिनस येथून ताब्यात घेण्यात आले होते.

मुंबई : केरळमधून गायब झालेल्या दोन मुलांचा महिन्याभरापासून सुरु असलेला शोध अखेर संपला. मुंबई रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलांना कुर्ला रेल्वे टर्मिनस येथून ताब्यात घेण्यात आले होते. रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिन्यापूर्वी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने कुर्ला टर्मिनसवर घाबरलेल्या अवस्थेतील ६ वर्षांचा आर्यन आणि ४ वर्षांची अमृताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुलांची चौकशी केली असता ती मुले दक्षिणात्य भाषेत बोलत असल्यामुळे त्यांना काही समजले नाही. या मुलांना बाल कल्याण विभागाच्या ’बालमंदिर’ या चेंबूर येथील बालगृहात ठेवण्यात आले. येथे आलेल्या एका व्यक्तीने ओळखले की ही मुले मल्याळम भाषेत बोलत आहेत. यावेळी केरळ पोलिसांशी संपर्क साधल्यावर ते याच दोन मुलांना शोधात आहेत असल्याचे समजले.वर्षभरापूर्वी या मुलांच्या आई शोभा हिने प्रियकर मंजुनाथच्या मदतीने वडील राजू यांची हत्या केली होती. हत्येनंतर त्यांनी राजूचे शव जंगलात नेऊन जाळले. त्यानंतर शोभाने मंजुनाथला सोबत राहण्यासाठी आग्रह धरला. मात्र मंजुनाथने तिला नकार दिला. शोभापासून सुटण्यासाठी त्याने तिचाही काटा काढला. शोभाची महिन्याभरापूर्वी हत्या केली आणि तिचे शव एका विहिरीत टाकून दिले. केरळच्या इरिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे शव सापडल्यामुळे या हत्येची उकल करण्याची जबाबदारी सब इन्स्पेक्टर ए. अंशद यांच्याकडे सोपवण्यात आली. तपासादरम्यान त्यांना मंजुनाथचा सुगावा लागला आणि त्यांनी त्याला अटक केली. आपला गुन्हा कबूल केल्यानंतर मंजुनाथने सांगितले, शोभा आणि राजूच्या दोन मुलांना त्याने बेंगलोर येथून एका ट्रेनमध्ये बसवून दिले, त्या नंतर ती मुले कुठे गेली ते त्याला माहित नव्हते. सब इन्स्पेक्टर ए. अंशद आणि त्यांच्या सर्वत्र त्यांचे फोटो पाठवले होते. (प्रतिनिधी)आत्याने स्वीकारली जबाबदारीगुरुवारी ए. अंशद यांच्या नेतृत्वात केरळ पोलिसांची टीम, मुलांची आत्या काव्या आणि तिचे पती मुंबईत आले. शुक्रवारी चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या समोर मुलांची आत्या काव्या हिने मुलांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुलांना केरळ पोलिसांसोबत आपल्या घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. शनिवारी ही मुले आपल्या घरी परतली आहेत.