शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बेछूट गोळीबारात दोघे भावंडे जखमी

By admin | Updated: June 26, 2017 03:27 IST

शहरातील भारत नगरासह पवन नगर भागात पोलीस दप्तरी कुविख्यात व हद्दपार असलेल्या आरोपींनी बेछूट गोळीबार केल्याने पुन्हा

गणेश वाघ/ऑनलाइन लोकमत

भुसावळ, दि. 26 -शहरातील भारत नगरासह पवन नगर भागात पोलीस दप्तरी कुविख्यात व हद्दपार असलेल्या आरोपींनी बेछूट गोळीबार केल्याने पुन्हा बिहारराज अवतरल्याची परिस्थिती निर्माण झाली़ या घटनेत भावंडे जखमी झाली आहेत तर गोळीबारानंतर आरोपींनी तीन दुचाकींवरून पळ काढला़रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे़पोलीस दप्तरी हद्दपार असलेल्या मुकेश भालेरावसह जितू भालेराव, गौरव बढे, गौतम चिल्ला व अन्य पाच जणांनी मद्यधूंद अवस्थेत तीन दुचाकींवर भारत नगरात येत गावठी कट्ट्याद्वारे हवेत तीन फैरी झाडल्या तसेच हातातील खंजर व तलवारीने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली़ भाजी विक्रेता राजेंद्र नामदेव काटकर यांच्यावर कट्टा रोखत त्यांचे कुलर तोडले तर जावेद जाफर तडवी (११) या बालकावर कट्टा रोखत हवेत तीन फैरी झाडण्यात आल्या़ गुन्हेगारांचा हा थरार पाहून या भागातील सीमा चौधरी या जागीच बेशुद्ध पडल्या़ गुन्हेगारांनी या भागातून पळ काढत पवन नगरात कृष्णा ट्रेडर्समागे उभ्या असलेल्या भावंडाशी हुज्जत घातली़ अभियंता असलेल्या निखील किशोर झांबरे (२४) यांच्या पायाला, हाताला गोळी लागली असून डोक्याला दगडफेक करण्यात आल्याने मार लागला़ त्यांना वाचवण्यासाठी भाऊ सुमीत किशोर झांबरे (२०) धावल्याने आरोपींनी त्याच्यावरही खंजरने वार केल्याने त्याच्या हाताच्या दंडासह पोटाला गंभीर दुखापत झाली़दरम्यान, सहा़पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक वसंत मोरे व सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली़ रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते़