ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 23 - स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शोभा मल्लिकार्जुन वाघमारे (वय 24, रा. अंबाबाई मंदिर परिसर, रामवाडी, सोलापूर) हिचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून आईसह दोघा भावांना सलगर वस्ती पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. आई लक्ष्मीबाई मल्लिकार्जुन वाघमारे (वय 48), भाऊ आनंद मल्लिकार्जुन वाघमारे (वय 28), संतोष मल्लिकार्जुन वाघमारे (वय 23) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बादोले यांनी सलगरवस्ती पोलिसांत फिर्याद दिली होती. शोभाचे वडील मल्लिकार्जुन वाघमारे रेल्वे सुरक्षा बलात कर्मचारी असून कुर्डुवाडी येथे सेवेत आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी शोभा हुशार होती. घरात येऊन बाहेरील व्यक्तीने तिला मारले नसावे, तर घरातील व्यक्तीनेच तिचा गळा दाबून खून केला असावा, असा संशय पोलिसांना असल्याने आईसह दोघा भावांना अटक करण्यात आली आहे. शोभाचा खून का केला हे तपासात समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.
शोभाच्या खून प्रकरणी आईसह दोघा भावांना अटक
By admin | Updated: June 23, 2016 21:48 IST