शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिकाऱ्यांच्या दोन खुनातून लहरिया निर्दोष

By admin | Updated: December 30, 2016 17:17 IST

सीरियल किलर दिलीप कुॅँवरसिंह लहरिया (वय २७, रा. पथरिया, ता. बिलासपूर, जि. दुर्ग, छत्तीसगड) याची जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 30 - प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध नाही. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरातील दोघा भिकाऱ्यांच्या खून खटल्यातून संशयित आरोपी सीरियल किलर दिलीप कुॅँवरसिंह लहरिया (वय २७, रा. पथरिया, ता. बिलासपूर, जि. दुर्ग, छत्तीसगड) याची जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.  रेल्वे स्थानक परिसरात मे आणि जून २०१३ मध्ये पदपथावर झोपलेल्या पाच ते सहा भिकाऱ्यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सीरियल किलर दिलीप लहरिया याला अटक केली. लहरियावर तीन खूनांचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी रेल्वे स्थानक परिसरातील दोघा भिकाऱ्यांच्या खुनाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी १२ साक्षीदार तपासले होते. या खटल्याचा शुक्रवारी अंतिम निकाल झाला. लहरियावर १९ जून २०१२ रोजी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीच्या सुभाष रोडवर दुकानाच्या दारात झोपलेली वृध्दा शकुंतला महादेव जाधव (वय ६०) हिचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याची सुनावणी ३ जानेवारीपासून सुरु होत आहे. त्यामुळे लहरिया दोन खुनाच्या गुन्ह्यांतून निर्दोष झाला असला तरी वृद्धेच्या खुनाच्या सुनावणीमुळे त्याची पुन्हा कळंबा कारागृहात रवानगी केली. या मुद्द्यावरून झाला निर्दोषसंशयित लहरिया याचा खून करण्यामागे कोणताही हेतू नव्हता. सरकार पक्षातर्फे जे साक्षीदार तपासले ते नेहमीचे पंच आहेत. तसेच काही गुन्हेगारी रेकॉर्डवरील आहेत. लहरिया हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार झाले. त्याच्या समोर जो तपास केला गेला, त्याची जाणीव त्याला नव्हती. भिकाऱ्यांच्या खून मालिकेदरम्यान मुंबईहून पथक कोल्हापूरात आले होते. त्यामुळे आपल्यावरील डाग पसून टाकण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी घाईगडबडीने लहरियाला अटक केली. लहरियाच्या अटकेनंतर दोन महिन्यांनी शिर्डीमध्ये भिकाऱ्यांच्या खूनप्रकरणी सचिन रामदास वैष्णव या सीरियल किलरला शिर्डी पोलिसांनी अटक केली होती. त्याने चौकशीमध्ये कोल्हापुरातील भिकाऱ्यांच्या खुनाची कबुली दिली. त्याने हे खून केले नसतील कशावरुन त्यासंबधी कोल्हापूर पोलिसांनी काय चौकशी केली. लहरिया हा मनोरुग्ण आहे; त्यामुळे त्याला गुन्ह्यांत दोषी ठरविता येणार नाही. पोलिसांनी त्याला बळीचा बकरा बनविला आहे. त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करावी. असा युक्तिवाद वकील अ‍ॅड. दत्तात्रय कवाळे यांनी मांडला होता.