शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या सोने चोरीप्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: June 7, 2017 05:18 IST

एक कोटीची सोन्याची बिस्किटे चोरल्याप्रकरणी दुकानातील एका कर्मचाऱ्यासह दोघांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील एका सराफा दुकानातून सुमारे एक कोटीची सोन्याची बिस्किटे चोरल्याप्रकरणी दुकानातील एका कर्मचाऱ्यासह दोघांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली.नौपाड्यातील गोखले रोडवरील राजावत ज्वेलर्सच्या गुप्त तिजोरीमध्ये मालक हितेन जैन यांनी प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाची ३५ सोन्याची बिस्किटे २९ मे रोजी ठेवली होती. एक कोटी एक लाख ५० हजार रुपयांची ही बिस्किटे तिजोरीतून चोरी झाल्याचे शनिवारी सायंकाळी उघडकीस आले. सोमवारी हितेन जैन यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हितेन जैन यांनी त्यांचे कर्मचारी सुरेंद्रसिंग दातारसिंग शेखावत, सफाई कामगार रोहित पारटे आणि दुकानातील इतर कामगारांवर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता घटनेच्या दिवशी दुकान बंद केल्यानंतरही रोहित पारटे याच्या मोबाइल फोनचे लोकेशन दुकानाच्या जवळ दाखवत होते. या आधारे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यानेच चोरी केली असल्याची माहिती समोर आली. यामध्ये रोहितच्या मावस बहिणीचा पती सुनील सपकाळे याचाही सहभाग समोर आला असून, पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. राजावत ज्वेलर्सच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावल्यानंतर शटर ओढण्यापूर्वी चावी आतमध्ये टाकण्याची पद्धत आहे. जवळपास १0 वर्षांपासून नोकरीला असलेल्या रोहितला ही पद्धत माहीत होती. त्याने नेमका याचाच फायदा घेतला. घटनेच्या दिवशी दुकान बंद करण्याच्या वेळी तो आतमध्येच लपून राहिला. सर्व कर्मचारी निघून गेल्यानंतर त्याने सीसी कॅमेरे बंद करून तिजोरीतील सोने काढून घेतले, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून चोरीचे सोने जप्त करणे बाकी असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.