शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

दोघा हरीण तस्करांना अटक

By admin | Updated: June 12, 2015 00:36 IST

इस्लामपुरात कारवाई : दोन पाडसांची सुटका; विक्रीसाठी दहा लाखांचा सौदा

सांगली : रायगड जिल्ह्यातून हरणांची तस्करी करून ती सांगली जिल्ह्यात विकण्यासाठी येणाऱ्या तस्करांसह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवारी पहाटे अटक केली. मोटारीतील हरणांची दोन पाडसे ताब्यात घेण्यात आली आहेत.फिरोज बशीर कुडपकर (२५, रा. वारंग, ता. महाड, जि. रायगड) व संजय कृष्णा धुमाळ (३८, लाहोरी, ता. पोलादपूर, जि. रायगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. इस्लामपुरातील मध्यस्थांमार्फत या दोन हरणांचा दहा लाखाला सौदा ठरला होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे.इस्लामपुरात दोन हरणांना विकण्यासाठी रायगड जिल्ह्यातून दोन व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास पेठ-इस्लामपूर (ता. वाळवा) येथे ही गाडी थांबवून झडती घेतली, त्यावेळी मोटारीत पाठीमागे हरणांची दोन पाडसे आढळली. ही पाडसे चार महिन्यांची आहेत. संशयितांविरुद्ध हरणांची तस्करी केल्याचा गुन्हा इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हा तपास वनविभागाकडे सोपविला असून वनविभागाने संशयितांना आपल्या ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)प्रत्येकी दहा हजारांना खरेदी रायगड जिल्ह्याच्या मुंबोशी येथील बुवानामक व्यक्तीकडून फिरोजने ही हरणे प्रत्येकी दहा हजाराला खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही हरणांची तो इस्लामपुरातील मध्यस्थामार्फत विक्री करणार होता. गुरुवारी मध्यस्थाने त्याला बोलाविले होते. दोघांमध्ये मोबाईलवरून झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग प्र्राप्त झाले आहे. बुवा व इस्लामपुरातील मध्यस्थाचे नाव सांगण्यास नकार पोलिसांनी नकार दिला होता.वन विभागाने हरणांना ताब्यात घेतले. दुपारी त्यांना चांदोली अभयारण्यात सोडून दिले.