शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकांना दुप्पट टीडीआर; गृहबांधणी क्षेत्राला चालना

By admin | Updated: February 12, 2016 01:03 IST

शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या खासगी भूसंपादनावर टीडीआर दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. भूसंपादन कायद्यात जमिनीचा

- यदु जोशी,  मुंबईशासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या खासगी भूसंपादनावर टीडीआर दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. भूसंपादन कायद्यात जमिनीचा मोबदला बाजार दरापेक्षा दुपटीने मिळू लागल्यानंतर टीडीआर घ्यायला कोणी समोर येत नसल्याचा अनुभव आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गृहबांधणी क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य शासन वा स्थानिक स्वराज्य संस्था वा प्राधिकरणाला सार्वजनिक उपयोगाची इमारत जसे शाळा, आरोग्य केंद्र, वाचनालय आदी एखाद्याने बांधून दिले तर त्याला त्या मोबदल्यात टीडीआर देण्याची तरतूदही नवीन धोरणात करण्यात आली आहे. नगरपालिकांच्या शहरांमध्ये ९ मीटरपेक्षा अधिक पण १२ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांलगत भूखंड असेल तर एक हजार चौरस मीटरपर्यंत ०.२०, एक हजार ते ४ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर ०.४० तर ४ हजार चौरसमीटरपेक्षा अधिकच्या भूखंडावरही तेवढाच टीडीआर मिळेल. १२ मीटरपेक्षा अधिक पण १८ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांलगत असलेल्या १ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर ०.३०, एक हजार ते चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावर ०.५० तर चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिकच्या भूखंडावर ०.६५ इतका टीडीआर दिला जाईल. १८ मीटरपेक्षा अधिक पण २४ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांलगत असलेल्या एक हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावर ०.३०, एक हजार ते चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावर ०.६० तर त्यापेक्षा अधिकच्या भूखंडावर ०.९० इतका टीडीआर दिला जाईल. २४ मीटरपेक्षा अधिक पण ३० मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांलगत असलेल्या एक हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावर ०.३०, एक हजार ते चार हजार चौरस मीटरच्या भूखंडावर ०.८० तर त्यापेक्षा अधिकच्या भूखंडावर १.१५ इतका टीडीआर दिला जाईल. ३० मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांलगत असलेल्या एक हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावर ०.३०, एक हजार ते चार हजार चौरस मीटरपर्यंत १ तर त्यापेक्षा अधिकच्या भूखंडावर १.४० इतका टीडीआर दिला जाईल.टीडीआर म्हणजे काय?तुमची जमीन संपादित केल्यानंतर त्याचा पैशांच्या स्वरूपात मोबदला न देता चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यास त्याला ‘विकास हक्क हस्तांतरण’ (टीडीआर) असे म्हणतात. मिळालेला एफएसआय तुम्हाला त्याच शहरात अन्यत्र वापरून जादाचे बांधकाम नियमानुसार करता येते. अतिरिक्त टीडीआर मिळाल्याने बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. आता प्रतीक्षा मुंबईचीराज्यातील मुंबई वगळता सर्व महापालिकांच्या शहरांमध्ये आता टीडीआर दुप्पट करण्यात आला आहे. आज नगरपालिकांबाबतही हा निर्णय झाला. आता मुंबई महापालिकेबाबत कधी निर्णय होणार याची प्रतीक्षा आहे.