शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भिक लागली काय, मी तुला फुकट पोसणार काय ? शशांकने मागितले होते 2 कोटी 
2
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
3
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
4
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
5
"१५ हजारांचा चाजनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
6
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
7
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
8
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
9
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
10
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
11
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
12
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
13
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
14
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
15
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
16
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
17
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
18
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
20
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी

नक्षली हल्ल्यात वीस वर्षात १२ हजारांवर लोक ठार

By admin | Updated: July 19, 2016 18:22 IST

पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये जन्मलेल्या नक्षलवादाच्या राक्षसाने भारतात मोठ्या प्रमाणावर भय आणि अस्थिरता पसरवली आहे. बिहारमधील नक्षलवाद्यांबरोबरची

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.19 -  पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये जन्मलेल्या नक्षलवादाच्या राक्षसाने भारतात मोठ्या प्रमाणावर भय आणि अस्थिरता पसरवली आहे. बिहारमधील नक्षलवाद्यांबरोबरची सुरक्षा दलांची चकमक आणि नक्षलवाद्यांनी पेलेल्या भूसुरंगाच्या स्फोटात सोमवारी १० जवान ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांनी गेल्या वीस वर्षात देशातील १२ हजारांवर लोकांचा जीव घेतलेला आहे. यामध्ये २७१२ जवान शहीद झाले आहेत.
आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र ही नक्षल प्रभावित राज्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सन २०१५ पर्यंत नक्षली हल्ला किंवा त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत ९४७१ नागरिक मृत्यूमुखी पडले; तर २७१२ केंद्रीय आणि राज्य सरकारचे जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगढमध्ये महेंद्र कर्मा यांनी ‘सलवा जुडम’ मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा खातमा करण्याची योजना राबविली होती. त्याची किंमत २५ मे २००१३ मधील एका हल्ल्यात काँग्रेसला चुकवावी लागली. यामध्ये कर्मा यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल त्यांचा मुलगा दिनेश आणि अन्य २५ जण मृत्यूमुखी पडले. याच हल्ल्यात जखमी झालेले ज्येष्ठ काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल यांचेही नंतर निधन झाले.
 
नक्षलप्रभावित नऊ राज्यांमध्ये नक्षली हल्ल्यात आजवर झालेले मृत्यू असे, सन १९९३ -४६८, १९९४ - ३७६, १९९५ - ३९६,१९९६ -४५४,१९९७ -५८३,१९९८ -४८९,१९९९ -५९५,२००० -५४८,२००१ -५६४,२००२ -४८१,२००३ -५१५,२००४ -५६५,२००५ -५६९,२००६ -६७८,२००७ -६९१,२००८ -७१७,२००९ -९०८,२०१० -१००५,२०११ -६०८,२०१२ -४१५,२०१३ ते २०१५ -४२२ हून अधिक.