शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वीस गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: July 30, 2014 00:40 IST

गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार उपप्रदेशात जोरदार वृष्टी होत आहे.

वसई : गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार उपप्रदेशात जोरदार वृष्टी होत आहे. त्यामुळे उपप्रदेशाचा अनेक भाग पाण्याखाली गेला असून वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. भाताणो-उसगांव दरम्यानच्या पुलावरून सध्या पाणी वाहत आहे. त्यामुळे सुमारे 2क् गावांचा संपर्क तुटला आहे. उसगांव येथे पाण्यात अडकलेल्या 5क् जणांना स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले. ग्रामीण भागातही पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे.
काल रात्रभर कोसळलेल्या पावसाने वसई-विरार भागातील जनजीवन विस्कळीत झाले. विरार पश्चिमेस गोकुळ टाऊनशीप, नालासोपारा पूर्वेस तुळींज व आचोळे रोड या भागात गुडघ्याइतके पाणी भरल्यामुळे व्यापा:यांनी आपली दुकाने बंद केली. परंतु दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापा:यांच्या मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले. 
डहाणू तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाणी साचले. मुख्य रस्त्यांसह पूल व खाडी मार्ग पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. झाडे उन्मळून पडल्याने घरांची पडझड झाली. तारा तुटल्याने वीज खंडित झाली.
डहाणू तालुक्यात रविवारी सकाळपासून पावसाने जोर धरला होता. सोमवारी सर्वात जास्त 215 मिमी पाऊस झाला. मंगळवारी दुपारी बारा वाजेर्पयत या मोसमात 1,क्51 मिमी पाऊस झाल्याची नोंद तालुका हवामान विभागाने केली आहे. इराणी रोड परिसरातील व्यापारी संकु लात 3-4 फूट पाणी भरल्याने अन्नधान्य,  कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व मोबाइल दुकानांचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे स्थानिक व्यापा:यांनी सांगितले. उपनगरासह समुद्रकिना:यालगत गावांना पाऊस व वा:याचा जास्त फटका बसला. चिंचणी गावात दोन घरांवर झाड पडल्याने भिंतीची पडझड झाली. त्यामध्ये एक किरकोळ जखमी झाला. आगर, नरपड, चिखले, रामपूर इ. गावात ठिकठिकाणी झाडे पडून वीज तारांचे नुकसान झाले. चिखले गावातील मुख्य रस्त्याच्या बाजूचे झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली. घोलवड-बोर्डी परिसरातील सागरी महामार्गावरील खुटखाडी व वहिद्र पुल पाण्याखाली गेल्याने गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. चाकरमान्यांना घरी परतावे लागले. डहाणू-बोर्डी बस सेवा बंद करण्यात आली होती. रेल्वे स्थानकावर तुरळक गर्दी होती. बोर्डीत 1क् ते 15 घरात पाणी शिरले. बोरीगाव, जळवाई रस्ता व नागरपाडा मोरी पुरात वाहून गेली. ब्राम्हणपाडय़ातील गोरेपाडा येथील आदिवासींच्या घरात पाणी घुसल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश झांबर यांनी सांगितले.
 
शेतकरी दुहेरी संकटात : जून व जुलै महिन्यात शेतीकरिता पुरेसा असा पाऊस न झाल्याने प्रथम भात पेरण्या खोळंबल्या, भात रोपे तयार नसल्याने रोपण्याही खोळंबल्याने मध्यंतरी थोडासा पाऊस झाल्यावर रोपण्यांनी जोर धरला परंतु नंतर पावसानेही पाठ फिरविल्याने बरीचशी शेती रोपण्याअभावीच राहिली तर आता जी काही रोपणी झाली होती त्यापैकी ब:याचशा शेतजमिनी आज पाण्याखाली गेल्या काही ठिकाणी भातरोपणी वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे.
 
4रामपूर गावात रविवारी संध्याकाळी चिंचेचे झाड उन्मळून पडल्याने तीन घरांची पडझड झाली. पीडितांना भरपावसात उघडय़ावर संसार करण्याची वेळ आली. जीवितहानी टळली तरी आर्थिक हानी झाली. तलाठी अनिल वायाळ यांनी पंचनामा केला. सरस्वती माच्छी प्रसूतीकरिता रुग्णालयात दाखल असल्याने अनर्थ टळला. 
 
4तिचे कुटुंबीय दवाखान्यात होते. 25 सिमेंट पत्रे फुटले. सीता माच्छी या महिलेची चार पत्रे फुटली व भिंतीची पडझड झाली. तीही सरवलीला रुग्णालयात होती. तर राधाबाई खोदाराम शुक्रखोद याच्या घराचे सोळा सिमेंट पत्रे फुटली. या सर्वाचे संसार रस्त्यार आला आहे. स्वयंपाक घर, भांडी, कपडे व इतर सामानाचे नुकसान झाले.
 
वसईत जनजीवन विस्कळीत
पारोळ : सतत दोन दिवस पडणा:या पावसामुळे वसईपूर्व भागातील जनजीवन ठप्प झाले. सोमवारच्या रात्रीच्या मुसळधार पावसामुळे शिरपली ते सायवनर्पयत अंबाडी शिरसाड मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली. त्याचप्रमाणो अंबाडी शिरसाड मार्ग येथे तर पहाटे दुचाकीस्वाराला रस्त्यावरील पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीसह वाहत जात असताना दुचाकीचालक दुचाकीसह पुरात वाहत गेला. त्याचप्रमाणो चांदीप येथे पुरात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी अगिAशमनदलाच्या बोटीला पाचारण करुन त्याला वाचविण्यात आले. 
तसेच तपसई, चांदिप, कोपर, खरारतारा, हेदवडे या तानसा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणो या भागातील वीज मुसळधार पावसामुळे दोन दिवसांपासून गायब आहे. शेतक:यांचेही या पुरात मोठे नुकसान झाले असून अनेकांची खणलेली रोपे वाहून गेली असून सतत तीन दिवस नवीन भातलागवड केलेली जमीन पाण्याखाली गेल्याने पीक कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.  (वार्ताहर)
 
 शहरातील मुख्य मार्ग पाण्याखाली
4पूरपरिस्थितीमुळे मेढे, भाताणो पूल पाण्याखाली गेल्यामुळे 5 गावांचा संपर्क तुटला असून आता ग्रामीण भागातील मुख्य मार्ग शिरसाड अंबाडीचा काही भाग पाण्याखाली गेल्यामुळे या संकटाने या भागातील जनजीवन ठप्प केले आहे.