मुंब्रा : अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मुंब्य्रात उघडकीस आली आहे.रशीद कम्पाउंड परिसरात जरीचे काम करणारे तसेच याच परिसरात भाड्याच्या घरात राहणारे मोहंमद रेहमान हे रात्री ९ ते १०.१५ दरम्यान बाजारात गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पाच आणि अडीच वर्षांच्या मुलींना त्यांच्याच सोबत राहणारा अब्दुल कैसर याच्या कडे ठेवले. बाजारातून परत आल्यानंतर त्यांना त्यांची पाच वर्षांची मुलगी दारात बसलेली दिसली, तर अडीच वर्षांची चिमुरडी घरात बेशुद्धावस्थेत दिसली. तसेच रक्तस्राव होत असल्याचे आढळले. कैसर गायब असल्याचेही दिसले. पोलिसांनी कैसरला अटक केली आहे. (प्रतिनिधी)
मुंब्य्रात अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
By admin | Updated: October 7, 2014 05:39 IST