शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांच्या मुलीला हृदयविकाराचे २० झटके

By admin | Updated: March 3, 2016 04:27 IST

सोलापूरमधील बार्शीमध्ये राहणाऱ्या एका चिमुकलीवर एका दुर्मिळ हृदयरोगासाठी (अ‍ॅनोमालस लेफ्ट कॉर्नरी आर्टरी फ्रॉम पल्मनरी आॅर्टरी-अल्कापा) करण्यात आलेली शस्त्रक्रीया यशस्वी झाली आहे

मुंबई : सोलापूरमधील बार्शीमध्ये राहणाऱ्या एका चिमुकलीवर एका दुर्मिळ हृदयरोगासाठी (अ‍ॅनोमालस लेफ्ट कॉर्नरी आर्टरी फ्रॉम पल्मनरी आॅर्टरी-अल्कापा) करण्यात आलेली शस्त्रक्रीया यशस्वी झाली आहे. बार्शी मधून मुंबईमध्ये उपचारांसाठी येईपर्यंत तिला तब्बल २० झटके आले. तरीही मुंबईत केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. पुढच्या काहीच दिवसांत तिला डिस्चार्ज देण्यात येणार असून तिला पुढे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. गिलबिले दाम्पत्याची मुलगी आदिती २ महिन्यांची होऊनही तिचे वजन कमी होत होते. ती सतत रडायची, तिला मधेच घाम फुटायचा व दूधही पित नसे. घटणारे वजन आणि रडण्याचे कारण काय? हे जाणून घेण्यासाठी गिलबिले यांनी अदितीला बार्शीच्या डॉ. चंद्रकांत मोरे यांच्याकडे नेले. अदितीची तपासणी केल्यावर डॉक्टरांना लक्षणे पाहून दुर्मिळ हृदयविकार असू शकतो, अशी शंका आली.बार्शीला उपचार करणे शक्य नसल्यामुळे अदितीला पुण्याच्या रुग्णालयात नेण्यात आले. उपचारासाठी लाखो रुपये लागतील. पण, त्यानंतरही शस्त्रक्रिया यशस्वी होईलच असे नाही, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. लाखो रुपये खर्च करणे शक्य नसल्यामुळे १८ फेब्रुवारीला मुंबईच्या सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाततिला दाखल करण्यात आले. अदितीला रुग्णालयात आणले तेव्हा श्वासाचा वेग वाढलेला होता, ती दूध पित नव्हती. ती सतत रडत होती. अशा अवस्थेत अदितीच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर तिला हृद्यविकार असल्याचे स्पष्ट झाले. पण, नक्की कोणता आजार आहे? हे शोधण्यासाठी तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी अदितीला ‘अल्कापा’ हा हृदयाचा दुर्मिळ आजार झाल्याचे निष्पन्न झाले. लहान मुलांच्या हृदयाच्या धमण्या, रोहिणी १ मिलीमीटरपेक्षाही लहान आकाराच्या असतात. अशावेळी शस्त्रक्रिया करणे, जिकिरीचे होते. पण, तिच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया होणे आवश्यक होते. त्यामुळे डॉक्टरांनी २२ फेब्रुवारीला शस्त्रक्रिया केली. तब्बल ९ तास शस्त्रक्रिया सुरु होती, असे रुग्णालयाच्या बाल हृदयविकार विभागाचे मुख्य सर्जन आणि विभागप्रमुख डॉ. शिवप्रकाश यांनी सांगितले.