शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तपासासाठी वीस पथके - गृहराज्यमंत्री शिंदे

By admin | Updated: February 16, 2015 23:19 IST

पुरोगामी नेत्यांवर हल्ले होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर इतर पुरोगामी नेत्यांना संरक्षण देणार का?

कोल्हापूर : भाकपचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय आहे. हल्लेखोरांच्या तपासासाठी २० पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, विविध दृष्टिकोनातून तपास सुरू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल येथे भेट देऊन डॉक्टर व पानसरे यांच्या नातेवाइकांशी चर्चा केली. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.मंत्री शिंदे म्हणाले, पानसरे दाम्पत्यावर झालेला भ्याड हल्ला निषेधार्थ आहे. गोविंद पानसरे यांची प्रकृती गंभीर, परंतु स्थिर आहे. त्यांच्यावरील काही शस्त्रक्रियांना यश आले आहे. अजून त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहेत. त्यांच्यासाठी आरोग्य सुविधांबाबत कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. गरज पडल्यास बाहेरील डॉक्टर व एअर अ‍ॅम्ब्युलन्सही मागविली जाईल.पानसरे यांचे सामाजिक क्षेत्रातील महत्त्व पाहता हल्ल्याच्या तपासासाठी विशेष २० पथकांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व दहशतवादविरोधी विभागातील अधिकारी वर्ग करून तपासासाठी नियुक्त केले आहेत. घटनेची व्याप्ती व सखोल माहिती समोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी संपूर्ण तपासावर विशेष पोलीस महानिरीक्षक निरीक्षण करतील. प्रथमदर्शनी दोन हल्लेखोर असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू आहे. त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, आवश्यकता वाटल्यास विशेष तपास यंत्रणेकडे (एसआयटी) तपास दिला जाईल.पुण्यातून पानसरेंना तुमचा दाभोलकर करू, अशी धमकीची पत्रे येत होती. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, या शक्यतेसह विविध दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. पुरोगामी नेत्यांवर हल्ले होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर इतर पुरोगामी नेत्यांना संरक्षण देणार का? यावर संंबंधितांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे संपर्क साधून संरक्षणाच्या मागणीचे पत्र प्रशासनास द्यावे, असे शिंदे यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)