शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख लीटर डिझेलचे ‘मातेरे’

By admin | Updated: September 14, 2014 01:04 IST

चालक-वाहकांना डिझेल बचतीचे ज्ञानामृत पाजणाऱ्या एसटी महामंडळाकडून वर्षाकाठी १ लाख २८ हजार लीटर डिझेलचे मातेरे केले जात आहे. ‘डॉकिंग’साठी (एसटीच्या चाकाच्या बुशची स्वच्छता) सर्रास महागडे डिझेल

‘डॉकिंग’साठी सर्रास वापर : रॉकेल मिळविण्यासाठी प्रयत्नच नाहीविलास गावंडे - यवतमाळचालक-वाहकांना डिझेल बचतीचे ज्ञानामृत पाजणाऱ्या एसटी महामंडळाकडून वर्षाकाठी १ लाख २८ हजार लीटर डिझेलचे मातेरे केले जात आहे. ‘डॉकिंग’साठी (एसटीच्या चाकाच्या बुशची स्वच्छता) सर्रास महागडे डिझेल वापरले जात असल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान महामंडळाला सहन करावे लागत आहे. एसटीच्या समोरील चाकाचे दोनही हब काढून त्यातील बेअरिंग स्वच्छ करण्यासाठी रॉकेलचा वापर करावा, असे एसटी महामंडळाचे संकेत आहे. मात्र गेली पाच-सहा वर्षांपासून या कामासाठी चक्क डिझेलचा वापर केला जात आहे. बसचे हब तीन महिन्यातून एकदा स्वच्छ करावे लागते. एकावेळी किमान दोन लीटर डिझेल लागते. राज्यात धावणाऱ्या १६ हजार बसेसच्या कामासाठी तीन महिन्यात ३२ हजार लीटर डिझेलचा वापर होतो. वर्षभरात या कामासाठी एक लाख २८ हजार डिझेल वापरले जाते.आज डिझेलचा दर प्रती लिटर ६५ ते ७० रुपये एवढा आहे. अर्थात एका बसचे हब स्वच्छ करण्यासाठी १३० ते १४० रुपयांपर्यंतचा खर्च येतो. रॉकेलने हब स्वच्छ केल्यास हाच खर्च केवळ ४० रुपयात (दोन लीटर रॉकेल) भागविला जाऊ शकतो. ६५ रुपये लीटरच्या डिझेलपेक्षा २० रुपये लिटरचे रॉकेल वापरल्यास एका बसमागे ८० रुपयांची बचत होऊ शकते. मात्र संचालकांच्या उदासीनतेमुळे महामंडळाचा वर्षासाठी ९० लाख रुपयांचा चुराडा होत आहे. रॉकेल वापरातून महामंडळाच्या खर्चात बचतीची मोठी संधी असतानाही संचालक मंडळाकडून गांभीर्याने प्रयत्न होत नाही. शासनाकडून सवलतीच्या दरातील रॉकेल मिळावे, यासाठी काही वर्षांपूर्वी तहसीलदारांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तताही झाली होती. मात्र माशी कुठे शिंकली हे कळायला मार्ग नाही. ‘डॉकिंग’साठी ज्या बसचे काम करायचे आहे, त्यातीलच डिझेल वापरले जाते. या प्रकारात संबंधित बसचा अ‍ॅव्हरेज कमी मिळतो. या प्रकाराला चालकास जबाबदार धरले जाते.