शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

बारावीत कोकण अव्वल

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

राज्यात प्रथम : विभागात सिंधुदुर्गचा झेंडा, कोकणचा ९५.६८ टक्के निकाल; राज्याचा निकाल ९१.२६ टक्के

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभागीय मंडळाचा निकाल ९५.६८ टक्के इतका लागला आहे. सलग चौथ्या वर्षी कोकण मंडळाने राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.६२ टक्क्यांनी निकाल अधिक असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भीमराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.राज्यातील एकूण नऊ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ अमरावती मंडळाचा ९२.५० टक्के, तर नागपूर मंडळाचा ९२.११ टक्के इतका निकाल लागला आहे. अमरावती व नागपूर मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी सचिव रमेश गिरी, सहसचिव किरण लोहार, सहायक सचिव चंद्रकांत गावडे, रत्नागिरी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे, सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी रघुनाथ अटुगडे उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून ३१ हजार ५५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३० हजार ३१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १६ हजार ५१४ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ५०९ विद्यार्थी (९३.९१ टक्के), तर १५ हजार १७३ विद्यार्थिनींपैकी १४ हजार ८०९ (९७.६० टक्के) विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातून २० हजार ६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १९ हजार ७५ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल ९५.०८ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११ हजार ६२७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११ हजार २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.७२ टक्के इतका लागला आहे. यावर्षी कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्याने झेंडा फडकविला आहे.कोकण विभागात १९४ कनिष्ठ महाविद्यालये असून, २१ परीरक्षक केंद्रे, तर ४७ परीक्षा केंदे्र आहेत.दि.४ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रके उपलब्ध होणार आहेत.(प्रतिनिधी)ेसर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचाकोकण विभागात सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा लागला आहे. विज्ञान शाखेत ९५.७२ टक्के, वाणिज्य शाखेत ९१.६0 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेत ८९.२0 टक्के, तर कला शाखेत ८६.३१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत.कॉपीचे प्रमाण ०.०३ टक्केकोकण विभागातून एकूण ३१ हजार ६८७ विद्यार्थी बसले होते. पैकी कॉपीचे एकूण ०.०८ प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे एकूण प्रमाण ०.०३ टक्के इतके आहे. राज्यात सर्वांत कमी कॉपीचे प्रमाण लातूर येथे असून, ०.०६ कॉपीचे प्रकार उघडकीस आले असून, टक्केवारी ०.०३ इतके आहे.निकालाचा वाढता आलेखमागील तीन वर्षांचा कोकण विभागाचा बारावीचा निकाल पाहता वाढता आलेख दिसून येत आहे. २०१२ मध्ये ८५.८८, २०१३ मध्ये ९४.८५, तर २०१४ मध्ये ९५.६ टक्के इतका निकाल लागला होता. यावर्षी ९५.६८ टक्के इतका निकाल लागला असून, निकालात ०.६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४७.७७ टक्केकोकण विभागातून ९८८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४७२ विद्यार्थी पास झाले आहेत. विभागाचा एकूण निकाल ४७.७७ टक्के इतका लागला आहे. पुनर्परीक्षार्थींमध्ये मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४६.४७ टक्के, तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५१.३२ टक्के इतके आहे.