शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

टी.व्ही., इंटरनेटवरून ‘नीट’चे धडे

By admin | Updated: May 15, 2016 04:44 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २४ जुलै रोजी ‘नीट’ परीक्षा घ्यावीच लागली, तर परीक्षेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार १९ मेपासून विद्यार्थ्यांना धडे देण्याची तयारी करत आहे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २४ जुलै रोजी ‘नीट’ परीक्षा घ्यावीच लागली, तर परीक्षेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार १९ मेपासून विद्यार्थ्यांना धडे देण्याची तयारी करत आहे. त्यासाठी टी.व्ही. आणि इंटरनेटचे माध्यम वापरणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी दिली.बालभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तावडे म्हणाले की, विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. पूर्वतयारीसाठी राज्य सरकारमार्फत १९ मेपासून दूरदर्शन, खासगी वृत्तवाहिन्या, इंटरनेट किंवा युट्युबमार्फत शिक्षणतज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यात दररोज एका तासात दोन विषय प्रत्येकी अर्धा तास शिकविण्यात येतील. या प्रशिक्षणासाठी काही वृत्तवाहिन्यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता प्रसारणाची तयारी दाखविलेली आहे. वेबसाईटच्या माध्यमातूनही हे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचप्रमाणे शिकवणीसाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केले जात असून, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सुविधाही त्यात उपलब्ध करून देण्यात येईल. एकंदरीतच नीट परीक्षेच्या अभ्यासापासून त्याची पूर्वतयारी याबाबतची सर्व माहिती आणि शिकवणी देणारा उपक्रम येत्या १९ मेपासून सुरू करण्याचा विचारही तावडे यांनी व्यक्त केला.‘नीट’ परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सोमवारी, १६ मे रोजी नवी दिल्लीत सर्व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एमबीबीएस आणि बीडीएसच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या पर्यायाचा शोध घेतला जाईल. शिवाय केंद्र सरकारमार्फत यासंदर्भात अधिसूचना काढण्याच्या विचारावर चर्चा करण्यात येईल. राज्याची फेरविचार याचिका अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र केंद्र सरकारच्या अधिसूचनेबाबत सर्व बाजूंनी कायदेशीर मुद्द्यांचा विचार सुरू असल्याने वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)