शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील रेल्वे प्रकल्प अडचणीत

By admin | Updated: April 19, 2017 03:18 IST

मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांमध्ये अडथळे येत असल्याने या प्रकल्पांची कालमर्यादा आणखी पुढे सरकत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांमध्ये अडथळे येत असल्याने या प्रकल्पांची कालमर्यादा आणखी पुढे सरकत असल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या जागांवर अतिक्रमण, ते हटवण्यास असलेला विरोध आणि जागेची कमतरता यामुळे प्रकल्प पुढे सरकण्यास अनंत अडचणी येत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अंधेरी ते गोरेगाव या हार्बर मार्गाचे विस्तारीकरण केले जात आहे. मात्र हा प्रकल्प बराच रखडला आहे. आता या प्रकल्पासाठी २0१७च्या डिसेंबरपर्यंतची मर्यादा वाढवून दिली आहे. दुसरीकडे एमयूटीपी-२ अंतर्गत बोरीवली-मुंबई सेंट्रल सहाव्या मार्गिकेचा प्रकल्पही बरीच वर्षे रखडला आहे. असून, हा प्रकल्प बरीच वर्षे रखडला आहे. या प्रकल्पासाठी कालमर्यादा वेळोवेळी बदलण्यात आली आहे. (प्रतिनिधी)ठाणे ते दिवा पाचवी-सहावी मार्गिकाहा मार्ग पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागतील, अशी माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली. प्रकल्पात काही बांधकामांचा अडथळा असून, ते पाडावे लागतील. त्यासाठी थोडा उशीर होत असून, प्रकल्पाचे काम मार्च २0१९पर्यंत पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी स्पष्ट केले. बेलापूर-सीवूड-उरण मार्च २0१८ नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वांत महत्त्वाच्या बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे काम मार्च २0१८पर्यंत पूर्ण करण्यात येईल. याआधी काम डिसेंबर २0१७ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात येत होते. परंतु, या प्रकल्पाच्या कामात काही वनविभागाची जमीन येत असल्याने कामाला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.