शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी घोटाळ्याच्या चौकशीचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात!

By admin | Updated: April 18, 2017 01:58 IST

खामगाव : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावरील तूर खरेदी घोळ प्रकरणाचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे.

कबुली जबाबामुळे सचिव अडचणीत !

खामगाव : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावरील तूर खरेदी घोळ प्रकरणाचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे. उपनिबंधकांच्या प्राथमिक चौकशीत कृउबासच्या रजिस्टरमध्ये घोळ आढळून आल्याने, या संपूर्ण प्रकरणाची फाइल वरिष्ठांकडे सादर करण्यात आली आहे. खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर विभागीय निबंधक, सहा. उपनिबंधक, उपनिबंधक यांच्या चौकशीत कृउबासच्या दस्तावेजांमध्ये घोळ असल्याचे आढळले होते. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी हे दस्तावेज ताब्यात घेतले होते. अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. चौकशीमुळे बाजार समितीचे पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.लेखी जबाबामुळे सचिव अडचणीत!चौकशीदरम्यान तूर खरेदीचे नोंद रजिस्टर उपलब्ध करण्यास टाळाटाळ करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करणे, सोबतच नोंद रजिस्टर सभापतींकडे असल्याचा लेखी जबाब देणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्याचा उल्लेखच नाही!नोंद रजिस्टरवर शेतकऱ्यांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याचे ताब्यात घेतलेल्या दसवेजांवरुन स्पष्ट होत आहे. रजिस्टरमधील खाडाखोड आणि पाने फाडल्याचे निदर्शनास आले असून, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. शासनाच्या ध्येयधोरणाला कृउबासमधील पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी हरताळ फासला आहे. रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यास करण्यात आलेला विलंब, खाडाखोड, शेतकऱ्यांच्या नावांचा नसलेला उल्लेख आदी बाबींमुळे अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. जप्त रेकॉर्डची विभागीय निबंधकांकडून चौकशी सुरू आहे. तूर खरेदीची उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी आपली मागणी आहे. - आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर, खामगावखामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी होईपर्यंत इतर कोणत्याही वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कृउबासच्या संशयास्पद दस्तऐवजाची तपासणी करण्यात येत असून, संबंधित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल. - एम.ए.कृपलानी, सहा. उप निबंधक, खामगाव.