शहरं
Join us  
Trending Stories
1
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
2
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
3
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
8
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
11
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
13
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
14
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
15
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

तूरडाळ शंभर रूपयांनी देणार

By admin | Updated: November 5, 2015 03:42 IST

सरकारने जप्त केलेली तूरडाळ संबंधित व्यापाऱ्यांना हमीपत्रावर परत दिली जाईल आणि ती डाळ खुल्या बाजारात १०० रुपयांनी विक्री करण्याचे बंधन व्यापाऱ्यांवर घातले जाईल, असा निर्णय

सरकारची ग्वाही : जप्तीच्या कारवाईतील व्यापाऱ्यांकडून घेणार हमीपत्र

- अतुल कुलकर्णी,  मुंबई सरकारने जप्त केलेली तूरडाळ संबंधित व्यापाऱ्यांना हमीपत्रावर परत दिली जाईल आणि ती डाळ खुल्या बाजारात १०० रुपयांनी विक्री करण्याचे बंधन व्यापाऱ्यांवर घातले जाईल, असा निर्णय अन्न व पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी बुधवारी रात्री जाहीर केला.लोकमतशी बोलताना बापट म्हणाले, जवळपास ९० हजार मे. टन डाळ जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली डाळ मुक्त करण्याची प्रक्रिया तीन महिन्यांची होती, ती सात दिवसांवर आणणारा आदेश काढून पंधरा दिवस झाले तरीही त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई गतीने केली नव्हती. दिवाळी तोंडावर आलेली असताना मार्ग काढण्याचे प्रयत्न मंगळवारपासून सुरू होेते. शेवटी ज्यांची डाळ जप्त करण्यात आली आहे, त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेऊन त्यांना डाळ परत करण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले. गुरुवारपासून १०० रुपयांत ही डाळ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.विशेष म्हणजे, डाळींवर निर्बंध घालण्याचे आदेश देणारी तब्बल पाच पत्रे केंद्र सरकारने राज्याला पाठवली; मात्र महाराष्ट्र शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाने एप्रिल ते आॅक्टोबर या काळात या पत्रांवर कोणतीही कारवाई केली नाही. ही सर्व पत्रे लोकमतकडे आहेत. अधिकारी निर्णय घेत नाहीत, अन्न सुरक्षाविषयक समित्या स्थापन होत नाहीत ही बाब लोकमतने निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश काढले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी डाळींच्या साठ्यांवर निर्बंध घालण्याचे आदेश काढण्यात आले त्याच दिवशी रात्री पुणे, मुंबई, नवी मुंबईसह राज्यभर धाडी घालणे सुरु झाले. काही अतिउत्साही अधिकाऱ्यांनी वेअरहाऊसवर थेट गुन्हेच दाखल केले, तर तीन मीलवर तहसिलदाराचे प्रमाणपत्र नाही या कारणासाठी सील ठोकले. केंद्राचा पत्रव्यवहार असा -१५ एप्रिल - डाळींचे भाव वाढण्याची शक्यता आहे तातडीने साठा मर्यादा जाहीर करा.१७ जून - साठेबाजी रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई करा.१७ आॅगस्ट - तुमच्या राज्यात कोणती पावले उचलली ते केंद्राला तातडीने कळवा.२५ सप्टेंबर - वेअरहाऊसेसनी त्यांचाकडचा साठा जाहीर करण्याचे आदेश जारी करा.१ आॅक्टोबर - डाळीचे दर साठेबाजी व नफेखोरीच्या हेतूनेच वाढले आहेत. तातडीने साठा निर्बंध लागू करा.२८ सप्टेंबर - केंद्र शासनाने स्वत:च डाळींच्या साठ्यांवर निर्बंध लागू केले.२० आॅक्टोबर - अखेर राज्यात अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी साठा मर्यादा जाहीर करणारे आदेश काढले.