शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची सांगता शनिवारी होणार

By admin | Updated: July 29, 2016 20:55 IST

ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दणाणला. पिंपरीगावातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याची मनोभावे सेवा केली.

पिंपरी : भूवैकुंठातील सावळ्या विठ्ठलाची भेट घेऊन परतीच्या मार्गावर निघालेला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत प्रवेशिला. ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दणाणला. पिंपरीगावातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याची मनोभावे सेवा केली. सोहळा पिंपरीत मुक्कामास राहणार असून, शनिवारी श्रीक्षेत्र देहूगावात पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.

आषाढी वारीसाठी तुकोबारायांच्या पालखीने श्रीक्षेत्र देहूगाव येथून २७ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले होते. आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेऊन सोहळा परतीच्या मार्गावर निघाला. काल पुण्यात पालखीचा मुक्काम होता. सकाळी पालखीसोहळा पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ झाला. वाकडेवाडी, कासारवाडीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पालखी सोहळा दाखल झाला. त्यानंतर गोकुळ चौक, शगुन चौक मार्गे पिंपरीगावात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोहळा प्रवेशिला. या वेळी पिंपरीकरांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. पालखी येताच जोगमहाराज प्रासादिक दिंडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात थंडावा जाणवत होता.

या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, क्रीडा समिती सभापती समीर मासूळकर, नगरसेविका उषा वाघेरे, संदीप वाघेरे, अमर कापसे, गोलांडे मामा, मनोहर सुपेकर, विजय जाचक, अण्णा कापसे, दत्तात्रेय वाघेरे, दिलीप दातीर-पाटील, नंदू कापसे, राजाराम कुदळे, राहुल नलावडे आदी उपस्थित होते. पालखी मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. तसेच विठूरायाचा महिमा सांगणारी भक्ती, भावगीते सुरू होती. या वेळी विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.

विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज यांच्यासह वारकऱ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यानंतर ढोलपथकांच्या गजरात आणि रांगोळ्यांच्या पायघड्यांवरून पालखी भैरवनाथ मंदिरात आणण्यात आली. पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी परंपरेप्रमाणे आरती झाली. रात्री जोग महाराज दिंडीच्या वतीने जागर झाला. ग्रामस्थ आणि असंख्य सिंधी बांधवांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नप्रसाद आणि फराळाचे वाटप करण्यात आले.सोहळ्याची आज होणार सांगता

पालखी शनिवारी सकाळी सातला देहूकडे प्रस्थान ठेवणार आहे. निगडीतील खंडोबा मंदिर येथे सकाळी १०ला विसावा होईल. त्यानंतर देहूरोडमार्गे चिंचोलीतील शनिमंदिर आणि अनगडशाहवलीबाबा दर्गा येथे परंपरेप्रमाणे आरती होणार आहे. देहूतील मुख्य मंदिरात दुपारी तीनच्या सुमारास पालखी परतेल. संत तुकाराममहाराज संस्थानाच्या वतीने वारकऱ्यांना नारळप्रसाद दिला जाईल. फराळवाटप होईल आणि सोहळ्याची सांगता होईल, असे संस्थानचे संत तुकाराममहाराज देवस्थानाचे अध्यक्ष शांताराम मोरे यांनी सांगितले.

पावसाच्या कृपेने सुखावले वारकरीपावसाचे दान मागत निघालेल्या सोहळ्याच्या वाटचालीत पावसाची कृपा झाली. त्यामुळे वारकरी सुखावला. हे समाधान परतीच्या वाटेवरील वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. पिंपरी-चिंचवड परिसरात सोहळा प्रवेशिला तेव्हा पावसाची भुरभुर जाणवली. जाणीव फाउंडेशनचे सह्याद्री ढोलपथकाने दणदणाट केला. तसेच ढोल-ताशापथकांनीही सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी दत्तात्रय सोनवणे यांनी संत तुकाराममहाराज पालखी रथाची प्रतिकृती देवस्थानाचे अध्यक्ष शांताराम मोरे यांना भेट म्हणून दिली