शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘तूरकोंडी’त टोकणचा गोंधळ!

By admin | Updated: May 1, 2017 04:58 IST

राज्यात २२ एप्रिलपर्यंत टोकण पद्धतीने नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी सरकारने नव्याने

रूपेश उत्तरवार / मुंबई/यवतमाळ राज्यात २२ एप्रिलपर्यंत टोकण पद्धतीने नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी सरकारने नव्याने काढलेल्या खरेदी आदेशात ‘टोकण’चा उल्लेखच नसल्याने पणन विभागाचे अधिकारी गोंधळात आहेत.राज्यात २२ एप्रिलपर्यंत हमीभावाने ४० लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. परंतु खरेदी केंद्रांवरील ८ लाख क्विंटल आणि शेतकऱ्यांकडील टोकण पद्धतीने नोंदणी झालेली ७ लाख क्विंटल, अशी एकूण १५ लाख क्विंटल तूर खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. सरकार फक्त दहा लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. तूरकोंडीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी टोकणवरील सर्व तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, हस्तक्षेप योजनेतंर्गत काढण्यात आलेल्या खरेदी आदेशात ‘टोकण’चा उल्लेखच नाही. त्यामुळे पणनचे अधिकारी फक्त खरेदी केंद्रावरील तूरीचे माप करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडील तुरीचे काय होणार, हा प्रश्नच आहे. यासंदर्भात सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नोंदणी केलेल्या पण शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या तुरीबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर असलेली तूर प्राधान्याने खरेदी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रात असलेली शेतकऱ्यांची तूर खरेदी करताना तालुक्याबाहेरचे शेतकरी किंवा इतर ठिकाणचे शेतकरी असा भेद होणार नाही. मात्र ही तूर शेतकऱ्यांची आहे किंवा नाही हे तपासले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्याच्या स्थितीत जागेचा प्रश्न भेडसावत आहे. केंद्रीय वखार महामंडळ आणि राज्य वखार महामंडळात तूर ठेवायला जागा नाही. यामुळे खरेदी झालेली तूर दोनशे किलोमीटर अंतरापर्यंत इतरत्र हलविण्याच्या सूचना आता सहकार मंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे तूर ठेवण्याची पावती मिळताच शेतकऱ्यांना आरटीजीएसच्या मदतीने चुकारे मिळणार आहेत.बारदान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला बारदाना खरेदीचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे बारदान्याच्या तुटवड्याने यापुढील काळात तूर खरेदी थांबणार नाही, याची खबरदारी सहकार विभागाने घेतली आहे.मोजमाप... नाफेडद्वारे तूर खरेदी पुन्हा सुरु करण्यात आल्याने तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप सुरु झाले आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तुरीच्या पोत्यांचा असा खच पडलेला आहे.राज्यातील तूर इतरत्र हलविणार राज्य शासन १० लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. ही तूर मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इतर राज्याकडे ती वळती करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने इतर राज्यांचा शोध घेण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिले आहेत. लवकरच खरेदी होणारी तूर इतरत्र हलविली जाणार आहे. नाफेडचे दोनशे कोटींचे चुकारे अडकले४० लाख टन तुरीची खरेदी नाफेडने कली. या तुरीचे चुकारे अदा करण्याचे काम नाफेडची यंत्रणा करीत आहे. नाफेड २२ एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे देणार आहे. या यंत्रणेकडे राज्यातील शेतकऱ्यांचे दोनशे कोटींचे चुकारे अडकले आहे. या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांना महिनाभराची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील  केंद्रांवर आलेली तूर प्राधान्याने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर टोकनवरील तूर शहानिशा करून खरेदी होणार आहे. - सुभाष देशमुख,सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री