शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढेंची आयुक्तपदावरुन बदली

By admin | Updated: March 24, 2017 22:49 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले नवी मुंबई महापालिकेचे तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर एस. रामास्वामी नवे पालिका आयुक्त होणार आहेत

ऑनलाइन लोकमतनवी मुंबई, दि. 24 - गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले नवी मुंबई महापालिकेचे तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर एस. रामास्वामी नवे पालिका आयुक्त होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असणारे तुकाराम मुंढे यांची सर्वपक्षीय दबावामुळे बदली झाल्याचे बोललं जातं आहे. मुंढे यांनी अनिधिकृत बांधकामविरोधात आक्रमक मोहिम राबवल्यामुळे सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांनेगी पालिका सभागृहात मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्यांची होणारी बदली लांबली. शेवटी मुंढे यांची आज राज्य सरकारकडून बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी पुणे येथे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक या पदावर असलेले एन. रामस्वामी यांची वर्णी लावण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदलीचे येत्या काळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंढे यांची बदली नेमकी कुठे करण्यात आली, याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रं हाती घेताच अनधिकृत बांधकामं, अतिक्रमणं, भ्रष्टाचार यांना वेसण घालण्यासाठी कठोर पावलं उचलली होती. तिथेच वादाची ठिणगी पडली आणि मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकजूट पाहायला मिळाली. 

दुसरीकडे आपत्ती निवारण, महसूल आणि वन विभाग, मंत्रालयाचे संचालक एस. के. दिवसे यांची बदली भंडाऱ्याला जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची बदली कोल्हापूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.