शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

तुकाराम मुंढेंनी स्वीकारला पीएमपीचा पदभार

By admin | Updated: March 29, 2017 18:25 IST

संचालकपद स्वीकारण्यास तुकाराम मुंढे तयार नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 29 - पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपद स्वीकारण्यास तुकाराम मुंढे तयार नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. कसलीही नाराजी नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाला सुरुवातही केली.राज्य शासनाने शुक्रवारी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर रात्रीच सर्व सूत्रं हलली आणि शनिवारी मागील नऊ महिन्यांपासून रिक्त असलेल्या पीएमपीच्या अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या नियुक्तीमुळे मुंढे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्या. पीएमपीमध्ये येण्यास ते अनुत्सुक आहेत. त्यांना पुणे पालिकेचे आयुक्तपद हवे असल्याची चर्चा रंगली होती. तर १ एप्रिल रोजी ते पदभार स्वीकारतील, असेही सांगितले जात होते. तसेच मंगळवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंढे यांच्या नाराजीवर बोलण्यास टाळले होते. त्यामुळे आणखी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मुंढे यांनी बुधवारी पीएमपीमध्ये येऊन या सर्व चर्चांना फोल ठरविले. सोमवारी मी नवी मुंबई पालिकेचा पदभार सोडला. मंगळवारी सुट्टी होती. त्यामुळे आज पदभार स्वीकारला आहे, असे सांगत त्यांनी वावड्या उडविणाऱ्यांना गप्प केले.बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुंढे पीएमपीच्या स्वारगेट येथील मुख्यालयात दाखल झाले. पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे त्यांच्यासोबत होते. यावेळी पीएमपीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये मुंढे यांच्याबद्दल मोठी उत्सुकता दिसून आली. त्यांना पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. मुंढे यांनी कार्यालयात जाऊन लगेचच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कामाला सुरुवात केली. दरम्यान, मागील नऊ महिन्यांपासून पीएमपीच्या अध्यक्षपदी पुर्णवेळ अधिकारी नव्हता. पुणे पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला होता. अभिषेक कृष्णा यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. त्यानंतर राज्य शासनाने धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती केली. मात्र, ते पुण्यात आलेच नाहीत. त्यामुळे प्रवासी संघटनांकडून सातत्याने पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी केली जात होती. आता मुंढे यांच्यारूपाने पूर्णवेळ कार्यक्षम अधिकारी मिळाल्याने पीएमपीला लवकरच अच्छे दिन अशी आशा व्यक्त केली जात आहे.