सोलापूर : नागपूरमध्ये मातंग समाजाने काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरातील मातंग समाज विकास संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले.पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. नागपुरातील कारवाईत जखमी झालेल्या ११४ आंदोलकांपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या लाठीहल्ल्याची चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी दुपारी भाजपाचे दक्षिण सोलापूरचे आ़सुभाष देशमुखयांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी मातंग समाज विकास संघर्ष समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला़ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा केला प्रयत्न
By admin | Updated: December 25, 2015 03:44 IST