शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

प्रांताधिका-यांना जिवे मारण्याचा वाळू तस्कराचा प्रयत्न

By admin | Updated: September 23, 2014 04:47 IST

अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारे पळून जाण्याचा प्रयत्न करीत थेट प्रांताधिका-यांनाच जिवे मारण्याचा प्रयत्न केला

अकलूज (सोलापूर) : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारे पळून जाण्याचा प्रयत्न करीत थेट प्रांताधिका-यांनाच जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ट्रकने प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीलाच धडक दिली. मात्र सुदैवाने त्यात ते बचावले.निवडणूक कामासाठी अकलूजहून वेळापूरला निघालेल्या प्रांताधिकारी अमृत नाटेकर यांना प्रतापसिंह चौकात वाळूचा ट्रक दिसला. त्यांनी ट्रक चालक नारायण कल्याण भोळे (रा. लवंग, ता. माळशिरस) यास वाळू वाहतुकीच्या परवान्याची मागणी केली. चालकाकडे परवाना नसल्याने नाटेकर यांनी त्यास ट्रक पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितले. परंतु त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. नाटेकर यांनी त्याचा पाठलाग ट्रक सदुभाऊ चौकात पकडला. त्यानंतर पुन्हा एकदा चालकाने ट्रक पुण्याच्या दिशेने पळविण्याचा प्रयत्न केला.नाटेकर यांनी निरा नदीच्या पुलावर सराटी येथे तो अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी चालकाने थेट प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला जोरदार धडक देत त्यांची गाडी पुलावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र नाटेकर यांनी गाडीतूनउडी मारल्याने ते बचावले. मात्र या गडबडीत चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक कठडा तोडून नदी पात्रात लोंबकळू लागला. ट्रक चालकाने पुन्हा पळून जात असताना कोतवाल सोमनाथ कस्तुरे यांनी त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)