शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

तीन मुलींना देहविक्रयासाठी विकण्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 9, 2016 05:30 IST

अंधेरीमध्ये तीन मुलींना देहविक्रयासाठी विकण्याचा डाव मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने हाणून पाडला. या प्रकरणी दोघांना सोमवारी रात्री समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत

मुंबई: अंधेरीमध्ये तीन मुलींना देहविक्रयासाठी विकण्याचा डाव मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने हाणून पाडला. या प्रकरणी दोघांना सोमवारी रात्री समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत, स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले. या सर्वांची अधिक चौकशी सुरू आहे.गौरव शर्मा (३०) आणि अपूर्व राऊत (३४) अशी अटक करण्यात आलेल्या या दोघांची नावे आहेत. अंधेरी पश्चिमच्या गुलमोहर मार्गावर स्टारबक्स हॉटेलजवळ काही लोक मुलींची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सापळा रचला आणि एका बोगस गिऱ्हाईकाला या दोघांना भेटण्यासाठी पाठविले. एका कारमधून हे दोघे तीन मुलींसोबत आले. या मुली कारमध्येच असताना या गिऱ्हाईकाने या दोघांकडे मुलींबाबत विचारणा केली. त्यानुसार, त्यांनी मागितलेले एक लाख रुपये या गिऱ्हाईकाने पुढे केले आणि त्याच क्षणी समाजसेवा शाखेच्या अन्य सहकाऱ्यांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या.या ठिकाणाहून मुक्तता करण्यात आलेल्या तीन मुलींपैकी दोघी मॉडेल आहेत, तर तिसरी मुलगी ही माजी हवाई सुंदरी असून, या तिघींनाही चित्रपटात काम मिळवून देतो, असे आश्वासन शर्मा आणि राऊत यांनी दिले होते. (प्रतिनिधी)