शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वेशात दरोड्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 16, 2016 02:27 IST

मुथुट फायनान्सच्या येथील कार्यालयावर भरदिवसा शस्त्रधारी सहा दरोडेखोरांनी दरोडा घालण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : सोन्यावर कर्ज देणाऱ्या मुथुट फायनान्सच्या येथील कार्यालयावर भरदिवसा शस्त्रधारी सहा दरोडेखोरांनी दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. यातील एक जण पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात होता. कार्यालयातील महिलांनी वेळीच दाखविलेल्या हुशारीमुळे दरोडेखोरांनी कारमधून पलायन केले.या प्रकरणी व्यवस्थापक रिना रेजी तोमस यांच्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हॉटेल अमरप्रीत चौकात मुथुट फिनकॉर्पचे कार्यालय आहे. सकाळी ९ वाजता व्यवस्थापक रिना रेजी, हिमा बाबू आणि व्ही.जी. गिव्हरगीस यांनी कार्यालय उघडले. ९.४० वाजता सोनेरी रंगाच्या मोटारीतून दोघे कार्यालयाकडे आले. प्रथम पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशात असलेला दरोडेखोर खाली उतरला. त्याच्यासोबत इतर चौघे घुसले. दरोडेखोर हा व्यवस्थापक रिना रेजी यांच्या केबिनमध्ये घुसला. त्याने सोन्यावर कर्ज घेण्याची प्रक्रिया विचारली. तुमच्याकडे चोरीचे सोने ठेवले आहे, असे सांगून सहा महिन्यांचा डीव्हीआर मागितला. त्यावर व्यवस्थापकाने ओळखपत्र विचारले. तेव्हा इतर दरोडेखोर स्ट्राँग रूमकडे जात होते. हे पोलीस नाहीत, असे लक्षात येताच व्यवस्थापक महिलेने हिमा बाबू हिला मल्याळम भाषेतून अलार्म वाजविण्यास सांगितले. हिमाने अलार्म वाजविला. तेव्हा एक ग्राहक मुख्य दरवाजावर आलेला होता. तेवढ्यात व्यवस्थापक महिलेने दोघांना ढकलून बाहेर येऊन आरडाओरड केली. त्यानंतर दरोडेखोरांनी रिव्हॉल्व्हर दाखवून महिलांना धमकावले आणि आत ओढून नेले. तोपर्यंत बाहेर लोकांची गर्दी जमा झाली होती. दरोडेखोरांनी कारमधून पोबारा केला.