शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सरोवर विकासासाठी प्रयत्न करणार-फुंडकर

By admin | Updated: March 4, 2017 02:23 IST

लोणार पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन; देश-विदेशातील पर्यटकांची हजेरी.

किशोर मापारीलोणार(जि. बुलडाणा), दि. ३- लोणार सरोवर व सरोवराचा परिसर शास्त्रज्ञांसाठी सर्वात उत्तम स्थळ आहे. खार्‍या पाण्याबरोबरच ऐतिहासिक, वैज्ञानिक व धार्मिक वारसा लोणारला लाभला असून, हा वारसा जपण्याची गरज आहे. सरोवर विकासासाठी प्रयत्न करणार असून, त्याकरिता आगामी होणार्‍या बजेटच्या बैठकीमध्ये सरोवर विकासाबाबत चर्चा करू, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.लोणार पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ३ मार्च रोजी ते बोलत होते. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवराचे संवर्धन होण्यासाठी येथे लोणार पर्यटन महोत्सव २0१७ चे आयोजन करण्यात आले असून, ३ ते ५ मार्चदरम्यान चालणार्‍या या महोत्सवाचे उद्घाटन कृषी व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री बुलडाणा पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला मातृतीर्थ सिंदखेड राजावरून लोणारला महोत्सव ज्योत आणण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रतापराव जाधव यांची उपस्थिती होती. कृषी व फलोत्पादन तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, की लोणार सरोवर परिसर हा खगोलशास्त्र अभ्यास करण्यासाठी जगातील सर्वात उत्तम स्थळ आहे. या ठिकाणाहून आकाशगंगेचा चांगला अभ्यास करता येऊ शकतो. खार्‍या पाण्यासाठी लोणार सरोवर प्रसिद्ध तर आहेच, शिवाय याठिकाणी ऐतिहासिक, वैज्ञानिक व धार्मिक वारसा मोठा आहे. तो आपण आपला समजून जोपासला गेला पाहिजे. तसेच समृद्धी मार्ग जवळून जात असल्याने त्याचाही फायदा लोणार सरोवर पर्यटन वाढीसाठी होईल, असे ना.पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे, नगराध्यक्ष भूषण मापारी, जि.प. अध्यक्ष अलका खंडारे, डॉ.विकास आमटे, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, आ. संजय रायमुलकर यांची उपस्थिती होती. प्राची धुमाळ यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या पर्यटन महोत्सवाला देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावत आहेत.