शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस अधिकाऱ्याला उडविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 30, 2014 00:37 IST

वाळू चोरी करून जात असलेल्या एका ट्रकचा पाठलाग करीत असलेल्या प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी गौरव सिंह यांना पोलीस जीपसह उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत सिंह आणि त्यांचे साथीदार

पोलीसही हादरले : वाळू माफियांची दादागिरी नागपूर : वाळू चोरी करून जात असलेल्या एका ट्रकचा पाठलाग करीत असलेल्या प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी गौरव सिंह यांना पोलीस जीपसह उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत सिंह आणि त्यांचे साथीदार थोडक्यात बचावले. पारशिवनी येथील वलनी घाटावर शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस विभागही हादरून गेला आहे. कन्हान आणि खापरखेडा पोलीस ठाणे हे वाळू आणि कोळसा माफियांचे गड समजले जातात. लतीफ अन्सारी हा वाळू माफिया आहे. व्यावसायिक दुश्मनीतून त्याने २०१० मध्ये प्रतिस्पर्धी अनवर याची वलनी चौकात गोळी झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर अनवरच्या समर्थकांनी पोलिसांची धुलाई केली होती. वलनी चौकी आणि पोलीस वाहन पेटवून दिले होते. या घटनेनंतर पोलिसांनी काही दिवसांपर्यंत लतीफला नियंत्रणात ठेवले. परंतु नेत्यांचे संरक्षण असल्याने तो पुन्हा सक्रिय झाला. लतीफला ग्रामीण राजकारणात सक्रिय असलेल्या एका आमदाराचा आश्रय आहे. हा आमदार गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी कुख्यात आहे. आमदारासह ग्रामपंचायतच्या निवडणुकीतही त्याने सक्रिय भूमिका बजावलेली आहे. त्याच्या इशाऱ्यावरूनच ग्रामीण पोलीस लतीफ आणि त्याच्या टोळीपुढे लाचार बनले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी लतीफला तडीपार केले होते. एप्रिल महिन्यात त्याने न्यायालयातून तडीपारीचे आदेश रद्द करवून आणले. तेव्हापासून तो पुन्हा वाळू चोरीत सक्रिय झाला. कन्हानमध्ये लतीफची टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी कारवाईची तयारी सुरू केली. कन्हानचे वादातीत ठाणेदाराची बदली केली. लतीफ टोळीचा सफाया करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी गौरव सिंह यांना कन्हान ठाण्याची जबाबदारी सोपविली. शनिवारी रात्री पोलिसांना वलनी घाटावरून लतीफ टोळीतर्फे वाळूची चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली. या आधारावर चोरांना रंगे हात पकडण्याची योजना आखण्यात आली. प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी गौरव सिंह आपल्या सहकाऱ्यांसह जीपने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रेतीसह ट्रकचालक पळून जात होता. त्याचा पाठलागत करताना ट्रक चालकाने त्यांना जीपसह उडविण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)