शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 06:19 IST

पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमुळे कायद्याचे रक्षकच असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण होत असून कल्याणमध्ये दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी

कल्याण : पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमुळे कायद्याचे रक्षकच असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण होत असून कल्याणमध्ये दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी मोठ्या आवाजात वाद्य वाजवण्यावरून जरीमरी मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांच्यात झालेल्या वादातून कार्यकर्त्यांनी डगळे यांना विसर्जन तलावाच्या पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंडळाच्या चार कार्यकर्त्यांना अटक झाली.कर्कश्श आवाजात वाद्य वाजवून हुल्लडबाजी करणाऱ्या ‘जरीमरी मित्र मंडळा’च्या कार्यकर्त्यांना आपण हटकल्याने त्यांनी विसर्जन तलावाच्या पाण्यात आपल्याला बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डगळे यांनी ‘लोकमत’कडे केला. या प्रकरणातील प्रमुख आरोपी राहुल विश्वनाथ गायकवाड (२०) याला कल्याणमधून, तर बिन्देश दत्ता गायकवाड (२१), नयन दिलीप गायकवाड (२२) व नरेश महादू गायकवाड (३२) यांना माणेरे गावातून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली आहे, अशी माहिती तपास अधिकारी संजू जॉन यांनी दिली. कल्याण पूर्व येथील जरीमरी तलावात दरवर्षीप्रमाणे दीड दिवसाच्या गणपतीचे मंगळवारी विसर्जन सुरू होते. त्या वेळी कार्यकर्ते आणि डगळे यांच्यात रात्री १० च्या सुमारास वाद झाला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन बंद केले. विसर्जन तलावाच्या ठिकाणी आजूबाजूच्या नागरिकांची मोठी गर्दी जमली. या गर्दी-गोंधळात एखाद्या गणेशमूर्तीला धक्का लागला, तर घटनेला वेगळेच वळण लागेल, हे ओळखून डगळे स्वत: पाण्यात उतरून गणपती विसर्जन करू लागले. हे पाहून जरीमरी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे पित्त खवळले. त्यापैकी राहुल गायकवाड याने तलावात उडी घेऊन गणपती विसर्जन करणाऱ्या डगळे यांना रोखण्याचा व त्यांचे डोके पाण्यात बुडवू त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. डगळे यांनी कसाबसा आपला जीव वाचवून पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जरीमरीच्या अन्य ३ कार्यकर्त्यांनी डगळे यांच्याशी हुज्जत घातली. कायद्याच्या रक्षकांवरील जीवघेण्या हल्ल्याचा हा दुर्दैवी प्रकार इतर हवालदार व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाइलमध्ये कैद करून आपल्या वरिष्ठांना कळवला. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होताच राहुल व त्याच्या अन्य ३ साथीदारांनी तेथून पळ काढला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलिसांवर हल्ले होत असतानाच डगळे यांच्यावरील हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. डगळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार जणांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जरीमरी मित्र मंडळाने मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेले आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे. —————————————-————————————————-पोलिसांवरील हल्ल्याच्या ठळक घटनानरसिंग महापुरे (४५) नौपाडा वाहतूक शाखेचे हवालदार यांना तीनहातनाका येथे योगेश भांबरे (२९) या मद्यपी वाहनचालकाने गाडीने उडवले व फरफटत नेले.................शशिकांत कालगुडे या शिवसेना शाखाप्रमुखाकडून वाहतूक शाखेच्या महिला हवालदाराला भररस्त्यात मारहाण व विनयभंग.................आबासाहेब थोरात या वाहतूक शाखेच्या हवालदाराच्या अंगावर खारेगाव टोलनाका येथे ट्रक नेऊन चिरडले..................विश्वास वालावलकर, नंदकुमार पाटील आणि कैलास बास्ते या तीन हवालदारांवर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींनी विटा फेकून त्यांना जखमी केले .................भिवंडीत बाबासाहेब बोराडे व अरुण बर्वे या दोन बीटमार्शलवर घरफोडी करणाऱ्या आरोपींनी चाकूहल्ला केला.................भिवंडी येथील दंगलीत गांगुर्डे व जगताप या दोन पोलीस हवालदारांना दंगेखोरांनी जिवंत जाळले.