शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करा

By admin | Updated: November 13, 2014 00:53 IST

सिंचन प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर द्या,असे निर्देश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

प्रधान सचिवांकडून आढावा : अधिकाऱ्यांना निर्देशनागपूर : सिंचन प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर द्या,असे निर्देश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात बुधवारी गोसेखुर्द आणि निम्न वर्धा प्रकल्पाच्या कामाचा आढावा मालिनी शंकर यांनी घेतला. बैठकीला विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, वर्धेचे जिल्हाधिकारी एन.नवीन सोना, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक शुक्ला, महसूल उपायुक्त राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.पूर्व विदर्भात सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी गोसेखुर्द आणि निम्न वर्धा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि प्रकल्पाचे बांधकाम वेळेत पूर्ण होईल, यादृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे; तसेच शासनाकडून प्राप्त निधी वेळेत खर्च होईल याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मालिनी शंकर यांनी दिल्या. शेतीसाठी पाणी सोडताना प्रकल्पातील जलसाठा आणि पाऊस याचे वेळापत्रक याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी व त्यासाठी संपर्क यंत्रणा अद्ययावत करावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. गोसेखुर्दचे काम पूर्णगोसेखुर्द प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यात पूर्णपणे पाणी साठवणूक करता येईल, असे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यावेळी सांगितले. प्रकल्पाची सिंचन क्षमता २,५०,८०० हेक्टर आहे तर, पाणी साठवणूक क्षमता ४४.७० टीएमसी एवढी आहे. धरणासाठी भूसंपादनाचे आणि पुनर्वसनाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे, असे अनुप कुमार म्हणाले.६४१ कोटींचे वाटपपर्यायी शेतजमिनीऐवजी रोख रक्कम, पुनर्वसन, गुरांचा गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत, नोकरीऐवजी एकमुस्त रक्कम आणि इतरही कामासाठी ११९९ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज शासनाने जाहीर केले होते. बुधवारच्या बैठकीत पॅकेजचाही आढावा घेण्यात आला. प्राप्त रकमेतून ६४१ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)