ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.19 - ट्रू जेट कंपनीची औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे . १९ ते २१ जुलै रोजी ही विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. या दिवसांची बुकिंग घेण्यात आली नाही. त्यामुळे विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही,असे विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी सांगितले.
दुरुस्तीसाठी विमान रद्द कण्यात आले आहे. त्याचे अनेक दिवसांपूर्वीच नियोजन करण्यात आले. ज्यांची बुकिंग होती, त्यांना काही दिवसांपूर्वीच याविषयी माहिती दिली. या तीन दिवसानंतर आणखी दोन दिवस ही विमानसेवा बंद ठेवण्याचे नियोजन आहे, असे ट्रु जेटच्या चिफ कमर्शियल अधिकाऱ्यांनी सांगितले. या कंपनीतर्फे वर्षभरापूर्वीच २६ जुलै २०१५ पासून औरंगाबाद- हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.