शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे खरे रुप जनतेसमोर : दलवाई

By admin | Updated: November 6, 2014 22:00 IST

काँग्रेसची इतकी दारुण अवस्था कधी झाली नव्हती. शतकोत्तर परंपरा असणाऱ्या या पक्षाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला

चिपळूण : सर्वसामान्यांचे सरकार असा कांगावा करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचे खरे रुप देशातील जनतेसमोर हळूहळू येऊ लागले आहे. एकूणच कारभार पाहता हे सरकार भांडवलदारांचे, उद्योगपतींचे असल्याचे लक्षात आले, असे मत राज्य सभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे खासदार दलवाई बुधवारी चिपळूण येथे आले होते. त्यांनी उत्तर रत्नागिरीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. दलवाई यांनी भाजपच्या सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसची इतकी दारुण अवस्था कधी झाली नव्हती. शतकोत्तर परंपरा असणाऱ्या या पक्षाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. आता कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. सरकारविरोधी दुहेरी लढा देण्याची गरज आहे. त्यासह पक्षाकडून निश्चित ताकद, बळ देण्यात येईल, असा विश्वास दलवाई यांनी व्यक्त केला. केंद्रातील भाजप सरकारने गोरगरिबांकरिता असणाऱ्या हितकारक योजना बंद करण्याचा सपाटा सुरु केला आहे. अन्नसुरक्षा कायद्यासारखी सर्वसामान्यांच्या हक्काची योजना हे सरकार बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. हे सरकार समाजात मोठ्या प्रमाणात फूट पाडण्याचे काम करीत आहे. भाजपचे खरे स्वरुप हळूहळू पुढे येत आहे. जनतेला आपल्या हक्कासाठी आता जागृत होऊन आंदोलन करावे लागेल. जनता मैदानात उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे दलवाई यांनी सांगितले. यावेळी दापोलीचे मधुकर दळवी, खेडचे अनंत जाधव, गुहागरचे रमाकांत बेलवलकर, चिपळूणचे संदीप सावंत, रामदास राणे, अशोक जाधव, अ‍ॅड. शांताराम बुरटे, सुधीर दाभोळकर, जीवन रेळेकर, लक्ष्मण खेतले, रणजित डांगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)जवखेडे येथील दलित हत्याकांडाचा काँग्रेसतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. आम्ही सर्व तालुक्यात तहसीलदारांना निवेदन देणार आहोत, तर तालुक्यातील सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होणार आहोत. या हत्याकांडातील दोषींना शिक्षा व्हायला हवी, असे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले.