शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
6
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
7
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
8
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
9
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
10
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
11
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
12
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
13
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
14
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
15
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
16
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
18
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
19
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
20
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच

ट्रकने शाळकरी विद्यार्थ्याला चिरडले

By admin | Updated: November 21, 2014 00:50 IST

अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अपघाताला कारणीभूत असलेला मेहता काटा तातडीने हटविण्यात यावा तसेच या भागातील वाहतूक नियंत्रित करावी,

बहीण गंभीर जखमी : कळमन्यात शिवसेनेचे आंदोलन; रास्ता रोको, प्रचंड तणावनागपूर : अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अपघाताला कारणीभूत असलेला मेहता काटा तातडीने हटविण्यात यावा तसेच या भागातील वाहतूक नियंत्रित करावी, आदी मागण्या करून आज सकाळी शिवसेनेने कळमन्यात जोरदार आंदोलन केले. आंदोलनामुळे मिनीमातानगरातील वाहतूक बंद पडली. दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला. स्फोटक स्थिती निर्माण झाली असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना कसेबसे शांत केले. कळमन्यातील सावरकरनगर लेआऊट (विजयनगर) मधील तुषार अशोक शाहू (वय ८) आणि त्याची बहीण रविना अशोक शाहू (वय १३) हे मिनीमातानगरातील राजीव उच्च प्राथमिक शाळेत शिकतात. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता सायकलने परत घरी येत असताना मेहता काट्याजवळ त्यांना एका भरधाव ट्रकने धडक दिली. त्यामुळे तुषारचा करुण अंत झाला तर रविना गंभीर जखमी झाली. तिला मेयोत दाखल करण्यात आले. या अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. या मार्गावर टपरीवाल्यांचे अतिक्रमण आहे. अपघातस्थळाजवळ मेहता काटा आहे. तेथे जड वाहनांची नेहमी वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. तो काटा तेथून बंद करावा आणि तेथील टपरीवाल्यांना हुसकावून लावण्याची वारंवार मागणी करूनही पोलीस, महापालिकेकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे या परिसरात नेहमीच अपघात होतात. बुधवारीसुद्धा असाच अपघात घडला आणि तुषारचा नाहक बळी गेला. यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच अपघातस्थळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून अतिक्रमण करणाऱ्या टपरीवाल्यांना, वाहतूकीत अडसर निर्माण करणाऱ्या वाहनधारकांना हुसकावणे सुरू केले. सकाळी ८ पासून आंदोलनाला सुरुवात झाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमूख सतीश हरडे यांच्या नेतृत्वात शहर उपप्रमुख टिंकूसिंह दिगवा, नगरसेवक जगतराम सिन्हा, रवनिश पांडे, चिंटू महाराज, संदीप पटेल यांच्यासह ५०० वर शिवसैनिकांनी हा मार्ग रोखून धरला. आंदोलनात मृत तुषारचे नातेवाईक, या भागातील नागरिक, शाळांमधील विद्यार्थी तसेच त्यांचे पालकही मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मृत तुषारच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, जीवघेण्या अपघाताला कारणीभूत असलेला मेहता काटा तातडीने हटवावा तसेच या भागातील वाहतूक नियंत्रित करावी, या मागण्या लावून धरल्या. (प्रतिनिधी)वातावरण चिघळलेसकाळी ८ पासून सुरू झालेले आंदोलन १०.३० पर्यंत सुरू होते. कुणीच वरिष्ठ घटनास्थळी न पोहचल्यामुळे संतप्त झालेल्या काहींनी धरम काट्यावर दगडफेक केली. त्यामुळे वातावरण चिघळले. स्फोटक स्थिती निर्माण झाली असतानाच वाहतूक शाखेचे उपायुक्त भरत तांगडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांशी चर्चा करून मागण्या समजून घेतल्या. त्या पूर्ण करण्यासाठी संबंधितांसोबत चर्चा करावी लागेल, असे सांगून सोमवारपर्यंत वेळ मागितला. अपघात रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्याचेही आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन थांबविण्यात आले. शाळेत अन् परिसरातही शोककळामृत तुषारचा परिवार गरीब आहे. त्याचे वडील अशोक शाहू ड्रायव्हिंग करतात. आई लक्ष्मीबाई घरकाम करते. त्याला रविना नामक बहीण आणि करण नामक भाऊ आहे. तो सर्वात लहान होता. राजीव गांधी स्कूलमध्ये तुषार दुसरीत शिकत होता. भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे कळल्यामुळे शाळेतच नव्हे तर परिसरातही तीव्र शोककळा पसरली. शिक्षक, विद्यार्थी अन् पालकांनी आज शाळेत जाण्याऐवजी आंदोलनस्थळ गाठून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.