शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

रेडकांनी भरलेला ट्रक पळविणारे अटकेत

By admin | Updated: May 30, 2016 03:46 IST

रेडकांनी भरलेला ट्रक लुटणाऱ्या आठ दरोडेखोरांना गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली.

मुंबई : रेडकांनी भरलेला ट्रक लुटणाऱ्या आठ दरोडेखोरांना गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. सोलापूर येथून मुंबईच्या दिशेने रेडके भरून येणारा ट्रक मुरबाड रोड येथे अडवून या दरोडेखोरांनी चालक आणि क्लीनरला मारहाण केली. त्यानंतर ट्रक घेऊन ते पसार झाले होते. अब्दुल रहीम मुन्ना खान, मोहम्मद सलीम कुरेशी, फराज मोहम्मद वकील कुरेशी, आसिफ अन्वर मुल्ला, शेरअली ऊर्फ समीर अब्दुल सत्तार चौधरी, आसिफ अकबर शेख, शब्बीर शाहबाज शेख आणि अज्जू शब्बीर शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहणारे तक्रारदार निजाम सरदार कुरेशी यांच्या जवळच्या मित्रांचा ट्रक सोलापूर येथून म्हशींची रेडके घेऊन मुरबाडमार्गे मुंबईतील देवनार येथे येत होते. त्याच दरम्यान मुरबाड रोडवर सहा जणांनी ट्रक अडविला. ट्रकचालक व क्लीनरला शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर या सहा लुटारूंनी रेडकांनी भरलेल्या ट्रकसह पळ काढला. याप्रकरणी तक्रारदार निजाम यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुरबाड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून कुठल्याही प्रकारची चौकशी न करता ट्रकचालक आणि क्लीनरला अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपी गोवंडी, कुर्ला परिसरात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अजय सावंत यांना मिळाली. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंडी परिसरात सापळा रचून फराज मोहम्मद वकील कुरेशीच्या मुसक्या आवळल्या. > चोरीचा ट्रक कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हस्तगत केला असून, आरोपी आणि मुद्देमाल मुरबाड पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.