शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कत्‍तलीसाठी गुरे घेऊन जाणारा ट्रक पेटविला, २९ मृत ११ जिवंत गुरांना काढले बाहेर

By admin | Updated: June 14, 2016 16:43 IST

गुरे घेऊन जाणारा ट्रक जमावाने अडवून त्याची तोडफोड केली तसेच त्यास जाळल्याची घटना चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ : गुरे घेऊन जाणारा ट्रक जमावाने अडवून त्याची तोडफोड केली तसेच त्यास जाळल्याची घटना चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने जमावाने केलेल्या दगडफेकीत चार पोलीस अधिकारी जखमी झाले.

सोमवारी सकाळी ११.३० वाजेनंतर तब्बल पाच तास हा प्रकार सुरू होता. दगडफेकीत सहायक पोलीस निरीक्षक आर. एन. पवार, अडावदचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, चोपडा शहराचे सहायक फौजदार वसंत चव्हाण, किरण पाटील हे जखमी झाले आहेत.धरणगावहून यावलकडे जाणाऱ्या ट्रकमधून गुरांची वाहतूक केली जात होती.

ट्रकचे टायर फुटल्यानंतरही बिंग फुटेल म्हणून चालकाने ट्रक तसाच चालविला. मात्र चोपड्यातील हतनूर पाटचारीजवळ काही महाविद्यालयीन तरूणांना संशय आला. त्यांनी ट्रकचा पाठलाग करून तो यावल रस्त्यावर अडविला. तेथून ट्रक बाजार समितीच्या आवारात नेण्यात आला. संतप्त जमावाने ट्रक चालक, क्लिनरला बेदम मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून दोघांची सुटका केली.

जमावाने ट्रकची ताडपत्री काढल्यानंतर त्यात तब्बल ४० गुरे कोंबलेली होती. त्यात २९ जनावरे मृत आढळून आली. गुरांचा ट्रक पकडल्याचे वृत्त पसरताच बाजार समिती आवारात हजारोंचा जमाव एकत्र आला.

पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांनी जमाव पांगविण्याचे आदेश दिले होते. रात्री उशिरापर्यंत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.