शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अडचणीत

By admin | Updated: January 14, 2017 04:18 IST

महापालिकेला गृहीत धरून मुंबईत मॅरेथॉनची जाहिरातबाजी करणाऱ्या आयोजकांना आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे.

मुंबई : महापालिकेला गृहीत धरून मुंबईत मॅरेथॉनची जाहिरातबाजी करणाऱ्या आयोजकांना आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. येत्या रविवारी होणाऱ्या या स्पर्धेचे जाहिरात फलक शहरभर फुकटात लावून वर लेजर शोचेही आयोजन करणाऱ्या या आयोजकांना पाच कोटी ४८ लाख रुपये पालिकेकडे जमा करण्याची ताकीद देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी केवळ २४ तासांची मुदत देण्यात आली असल्याने मॅरॅथॉनचे आयोजन आता अडचणीत सापडले आहे. ही रक्कम जमा न करताच मॅरेथॉन पार पडल्यास संबंधितांवर खटला दाखल करण्यात येईल, असा दमच आयोजकांना भरण्यात आला आहे. रविवारी, १५ जानेवारी रोजी मुंबई मॅरेथॉन होणार आहे. २००४ पासून मुंबईत दरवर्षी ही मॅरेथॉन होते. मात्र या स्पर्धेसाठी मुंबईत लावण्यात येणारे फलक-जाहिरातबाजीचे शुल्क चुकवण्यात येत नसल्याने यापूर्वीही २०११ मध्ये महापालिकेने आयोजकांना नोटीस पाठवली होती. यावेळेस जाहिरातबाजीबरोबरच लेजर शो चे आयोजन करण्यात आले आहे. मात्र जाहिरात शुल्क, भू -वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव जमा करण्यात न आल्याची गंभीर दखल महापालिकेने घेतली आहे. त्यानुसार पाच कोटी ४८ लाख ३० हजार ६४३ एवढी रक्कम पालिकेच्या अनुज्ञापन अधीक्षक यांच्याकडे जमा करण्याची नोटीस प्रशासनाने आज दिली. ही रक्कम भरण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजक व संयोजक ‘मे. प्रोकॅम इंटरनॅशनल लि.’ यांना २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. ही रक्कम न भरल्यास संबंधित आयोजकांवर विद्रुपीकरण तसेच अनधिकृतपणे जाहिरात फलक लावल्याबद्दल महाराष्ट्र डिफेसमेन्ट आॅफ प्रॉपर्टीस अ‍ॅक्टमधील तरतुदींनुसार खटला दाखल केला जाईल, असे ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. मात्र महापालिकेबरोबर आम्ही गेली १३ वर्षे मॅरेथॉन आयोजित करीत आहोत. पालिकेचे सहकार्य नेहेमी असते. त्यामुळे या प्रकरणातही अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे स्पष्टीकरण आयोजकांनी दिले आहे. (प्रतिनिधी)यांच्यामध्ये रंगणार जेतेपदाची चुरसआशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये आर्मीच्या धावपटूंमध्येच मुख्य लढत रंगेल. आॅलिम्पियन धावपटू खेता राम, मोहम्मद यूनिस आणि इलाम सिंग यंदाच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरणार असून या तिन्ही आर्मीच्या धावपटूंमध्येच जेतेपदाची चढाओढ रंगेल. दुसरीकडे, महिलांच्या पुर्ण मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राची ज्योती गवते संभाव्य विजेती असून अर्धमॅरेथॉनसाठी मोनिका राऊत, मनिषा साळुंखे आणि मिनाक्षी पाटील एकमेकींना आव्हान देतील. मुख्य मॅरेथॉनवर नजर टाकल्यास इथोपियाचे आयेले अबशेरो आणि डिंकनेश मेकाश यांचे भारतीय धावपटूंपुढे तगडे आव्हान असेल. मेकाशने दोन वेळा मुंबई मॅरेथॉनमध्ये बाजी मारली असून त्याच्याकडे यंदाही संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. तर, आयेलेने स्पर्धेत २:०४:२३ अशी जबरदस्त वेळ देत आपली छाप पाडली आहे.यंदाच्या स्पर्धेत पुर्ण व अर्ध मॅरेथॉनमध्ये मिळून एकूण ५३ एलिट धावपटू सहभागी झाले आहेत. तसेच आॅलिम्पियन धावपटूंच्या सहभागामुळे यंदा जेतेपदासाठी मोठी चुरस रंगेल.रेल्वे, वाहतूक पोलिसांची ‘विशेष’सेवाच्मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी रेल्वेने शनिवारी मध्यरात्री व रविवारी विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून प्रत्येकी दोन लोकल सोडण्यात येतील. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांकडूनही वाहतुकीचे नियोजन केले आहे. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी वाहने अन्य मार्गावर वळवतानाच पार्किंगसाठी प्रतिबंधही करण्यात आले आहे. च्पश्चिम रेल्वेने विरारहून दोन विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १४ जानेवारी रोजी विरारहून मध्यरात्री पावणे तीन वाजता तर १५ जानेवारी रोजी पहाटे ३.0५ वाजता चर्चगेटसाठी लोकल सोडण्यात येईल. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेच्या कल्याण आणि पनवेल येथूनही दोन लोकल सोडण्यात येणार आहेत. १५ जानेवारी रोजी कल्याण येथून पहाटे ३ वाजता, तर हार्बरवरील पनवेलहून पहाटे ३.१0 वाजता सीएसटीसाठी लोकल सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. च्रेल्वेबरोबरच मुंबई वाहतूक पोलिसांकडूनही वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. वाहन चालक, अत्यावश्यक वाहने यांना सहाय्य करण्यासाठी सीएसटी (भाटीया बाग जक्शन), हुतात्मा चौक जक्शन, सुंदर महाल जक्शन, एअर इंडिया जक्शन, मुंबई सेन्ट्रल रेल्वे जक्शन, वरळी नाका, एअरपोर्ट, सिध्दी विनायक मंदिर जक्शन, शिवाजी पार्क जक्शन, माहिम जक्शन येथे माहीती केंद्र स्थापन करण्यात आले आहे.