शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘तिहेरी तलाक’ शरियतनुसार टाळता येऊ शकतो, मुस्लीम धर्मगुरूंनी बनविला आराखडा; लवकरच सर्वोच्च न्यायालयात सादर

By azhar.sheikh | Updated: August 23, 2017 16:45 IST

नाशिकच्या धर्मगुरूंनी एकत्र येत शरियतमधील ‘तलाक’ संकल्पना अभ्यासून सूक्ष्म निरिक्षणे नोंदविली. शरियतचे पालन करत तिहेरी तलाक कसा टाळता येऊ शकतो, याबाबत विशेष आराखडा तयार करण्यात आला

ठळक मुद्देनाशिकच्या धर्मगुरूंनी एकत्र येत शरियतमधील ‘तलाक’ संकल्पना अभ्यासून सूक्ष्म निरिक्षणे नोंदविली. तिहेरी तलाक कसा टाळता येऊ शकतो?सर्वोच्च न्यायालयात एका विशेष जनहित याचिकेद्वारे लवकरच आराखडा सादर मदरशांच्या मुफ्ती या अतिउच्च दर्जाच्या धर्मगुरूंना तलाक कायद्याच्या मसुदा समितीमध्ये स्थान द्यावे, असा ठराव

अझहर शेख, नाशिक : नाशिकच्या धर्मगुरूंनी एकत्र येत शरियतमधील ‘तलाक’ संकल्पना अभ्यासून सूक्ष्म निरिक्षणे नोंदविली. नाशिकच्या धर्मगुरूंनी एकत्र येत शरियतमधील ‘तलाक’ संकल्पना अभ्यासून सूक्ष्म निरिक्षणे नोंदविली. तिहेरी तलाक कसा टाळता येऊ शकतो, याबाबत विशेष आराखडा तयार करण्यात आला असून, लवकरच सर्वोच्च न्यायालयात एका विशेष जनहित याचिके द्वारे तो सादर केला जाणार आहे.गाजत असलेल्या तिहेरी तलाक या विषयावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालामध्ये सरकारला सहा महिने कायदा तयार करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शाही मशिदीत शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये धार्मिक शरियतनुसार ‘तलाक’वर चर्चा करण्यात आली. यावेळी कायदा तयार करताना सरकारने मुस्लीम समाजाच्या देशातील काही शहरांमधील प्रमुख मदरशांच्या मुफ्ती या अतिउच्च दर्जाच्या धर्मगुरूंना तलाक कायद्याच्या मसुदा समितीमध्ये स्थान द्यावे, असा ठराव करण्यात आला. या ठरावानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करून शरिअतनुसार धर्मगुरूंनी तयार केलेला ‘तलाक’ संदर्भातील विशेष आराखडा मान्य केला जावा, अशी दाद मागितली जाणार आहे. तलाकची खरी पद्धत, धार्मिक नियमांनुसार तिहेरी तलाक कसा टाळता येऊ शकतो, याबाबत धर्मगुरूंनी या विशेष आराखड्यात आपली मते मांडली आहेत.

या धर्मगुरूंचा सहभागशहर-ए-खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली मौलाना मुफ्ती मुश्ताक अहेमद, मौलाना मुफ्ती रहेमत अली, मौलाना मुफ्ती महेबूब आलम, हाजी वसीम पिरजादा, हाजी मीर मुख्तार अशरफी यांच्या समितीने एकत्र येऊन धार्मिक साहित व हदीस यांचा अभ्यास क रून तलाक संकल्पनेनुसार निरिक्षणे नोंदविली. व आराखडा तयार केला आहे.या संस्थांना द्यावे प्राधान्यदारुल उलूम मुहम्मदीया, मुंबई, जामिया रजविया बरेली शरीफ, जामिया अशरफीया, मुबारकपूर, जामे अशरफ,कछौछा,उत्तर प्रदेश, जामिया कादरीया बदायू शरीफ या प्रमुख सुन्नी मुस्लीम संस्थांना प्राधान्य देऊन तेथे कार्यरत असलेल्या ‘मुफ्ती’ या पदावरील मुख्य धर्मगुरूं ना तलाक कायदा तयार करण्याच्या समितीमध्ये स्थान द्यावे तसेच सरकारने त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करावा, या ठरावाचे निवेदन पाठविण्यात येणार असल्याची माहिती पिरजादा यांनी दिली आहे