शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरलाही साधुग्रामसाठी अधिग्रहण सिंहस्थ कुंभमेळा : मागणीनुसार मिळणार आखाड्यांना जागा

By admin | Updated: August 30, 2014 04:37 IST

कुंभमेळ्यासाठी नाशिकला येणार्‍या साधू-महंत आणि त्यांचे खालसे यांच्यासाठी साधुग्राम विकसित केले जाते. त्र्यंबकेश्वर येथे आखाड्यांच्या स्वमालकीच्या जागा असल्या, तरी तेथेही आता आखाड्यांच्या जागा कमी पडू लागल्याने साधुग्रामची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे गेल्यावेळेप्रमाणे यंदाही साधुग्रामची उभारणी करण्यात येणार आहे आणि मागणीनुसारच जागावाटप करण्यात येणार आहे.

नाशिक : कुंभमेळ्यासाठी नाशिकला येणार्‍या साधू-महंत आणि त्यांचे खालसे यांच्यासाठी साधुग्राम विकसित केले जाते. त्र्यंबकेश्वर येथे आखाड्यांच्या स्वमालकीच्या जागा असल्या, तरी तेथेही आता आखाड्यांच्या जागा कमी पडू लागल्याने साधुग्रामची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे गेल्यावेळेप्रमाणे यंदाही साधुग्रामची उभारणी करण्यात येणार आहे आणि मागणीनुसारच जागावाटप करण्यात येणार आहे.कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर येथे शैव आखाडे येतात. या आखाड्यांच्या स्वमालकीच्या जागा असून, साहजिकच तेथे येणार्‍या साधू-महंतांच्या निवासाची व्यवस्था होत असते. त्यामुळे साधुग्राम विकसित करण्याची गरज भासत नाही; मात्र गेल्या कुंभमेळ्यात प्रथमच साधू-महंतांसाठी साधुग्राम तयार करावे अशी आखाड्यांकडे मागणी झाली. त्यानुसार शासकीय विश्रामगृहालगत साधुग्राम विकसित करण्यात आले होते. यंदा तशी थेट मागणी जिल्हा प्रशासनाकडे आलेली नाही. तथापि, कुंभमेळ्याच्या कालावधीत त्र्यंबकेश्वर येथे पोलिसांच्या तात्पुरत्या बराकी उभारण्यासाठी तसेच अन्य कामांसाठी जिल्हा प्रशासनाने तशी तयारी केली आहे. गेल्यावेळी शासकीय विश्रामगृहालगत ज्या ठिकाणी साधुग्राम विकसित करण्यात आले होते त्याच परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पन्नास एकर जागेत साधुग्राम आणि पोलिसांच्या बराकी उभारण्याची तयारी सुरू आहे. कुंभमेळ्यासंदर्भात त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या आराखड्यात सुरुवातीला त्याचा समावेश होता; परंतु आता ही कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत. लवकरच या जागेची पाहणी करून संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर जागेचे अधिग्रहणाचे सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.