शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ट्रायमॅक्स प्रकरणाची होणार चौकशी

By admin | Updated: November 9, 2015 03:14 IST

प्रवाशांना तिकीट उपलब्ध करण्यासाठी एसटी महामंडळाकडून वाहकांना काही वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक मशिन देण्यात आले

मुंबई : प्रवाशांना तिकीट उपलब्ध करण्यासाठी एसटी महामंडळाकडून वाहकांना काही वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक मशिन देण्यात आले. या कंपनीसोबत असलेल्या कराराची मुदत संपुष्टात येत असतानाच अनेक नियम धाब्यावर बसवून हे काम पुन्हा ट्रायमॅक्सलाच चढ्या भावाने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असल्याचे सांगत एसटी महामंडळाच्या शनिवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबरपूर्वी त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. एसटी महामंडळाने २00९ साली ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिन आणले. पाच वर्षांचा करार करताना एसटी प्रशासन आणि ट्रायमॅक्स कंपनीत झालेल्या करारानुसार वर्षाला ७५ कोटींपेक्षा अधिक तिकिटे विकली गेल्यास प्रत्येक तिकिटामागे २१ पैसे दराने ट्रायमॅक्सलाच पैसे मिळणार होते. तसेच ७५ कोटींपेक्षा कमी तिकिटे विकली गेल्यास नुकसानभरपाई म्हणूनही एसटी प्रशासन ट्रायमॅक्सलाच पैसे देईल, असे त्यात म्हटले होते. हा अजब करार करताना एसटीने आपल्या नफ्याचा विचार केला नाही. हा अजब करार आता संपुष्टात येत असतानाच करारानुसार ही सेवा आपल्या ताब्यात घेण्याऐवजी एसटीकडून पुन्हा ट्रायमॅक्सला मुदतवाढ देण्यात आली. तसेच प्रत्येक तिकिटामागे २१ पैसे दराऐवजी ४१ पैसे दराने वाढ देण्याचा निर्णय झाला. या संशयास्पद व्यवहाराबाबत एसटी महामंडळाच्या शनिवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसह अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) गौतम चॅटजी आणि अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी ट्रायमॅक्स कंपनीला मुदतवाढ देतानाच प्रत्येक तिकिटांमागे २१ पैशावरून ४१ पैसे एवढी वाढ देण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असून, अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे चॅटर्जी यांनी बैठकीत सांगितले. यावर बरीच चर्चा झाल्यानंतर ट्रायमॅक्स निविदा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवरील सदस्यांची दोन दिवसांत निवड होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.