शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेतून ‘तिहेरी तलाक’, पत्नीला घराबाहेरही काढले : वांद्रे येथील उच्चभ्रू परिसरातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 03:00 IST

घरातील चौथी मुलगी. शिक्षण सुरू असतानाच चांगल्या घरातून मागणे आल्याने लगीनघाई करत कुटुंबीयांनी तिचा विवाह करून दिला.

मनीषा म्हात्रे मुंबई : घरातील चौथी मुलगी. शिक्षण सुरू असतानाच चांगल्या घरातून मागणे आल्याने लगीनघाई करत कुटुंबीयांनी तिचा विवाह करून दिला. तीसुद्धा सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. विवाहानंतर महिनाभरातच पती आणि सासरच्या मंडळींनी अपशकुनी ठरवले. लग्नाला वर्ष झाले तरी मूल होत नाही म्हणून जादूटोण्याच्या अघोरी प्रथेत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यातूनही काहीच सिद्ध न झाल्याने विवाहितेला ट्रिपल तलाक देत, थेट घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथील उच्चभ्रू वसाहतीत उघडकीस आली. विशेष म्हणजे पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेण्यासाठी उदासीन पोलिसांनी तब्बल महिना काढला आहे.वर्सोवा परिसरात आई-वडील आणि तीन बहिणींसोबत राहणारी २१ वर्षांची राबीया (नावात बदल) घरात सर्वात लहान. १३ वीचे शिक्षण सुरू असतानाच चांगले स्थळ आले म्हणून कुटुंबीयांनी तिचा विवाह करण्याचे ठरविले. सासरच्या मंडळींनी लग्नानंतर शिक्षण सुरू ठेवण्याला होकार दिला. कुटुंबीयांनी मे २०१६ मध्ये आजिम शेखसोबत थाटामाटात मुलीचे लग्न केले. मात्र लग्नाच्या महिन्याभरानंतरच सासरच्या मंडळींनी तिला त्रास देत शिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिला. आधीच लग्नाचा भार वडिलांवर असताना पुन्हा आपले ओझे नको, त्यात नवीन संसारात वाद नको म्हणून ती शांत राहिली. माहेरच्या मंडळींनी दिलेल्या वस्तू कमी असल्याचे सांगून पतीच्या व्यवसायासाठी ५ लाखांची मागणी करण्यात आली.पैशांचा तगादा, त्यात अपशकुनी असल्यामुळे घरातील वाईट घटनांचा दोष तिच्या माथी सुरू झाला. ऊठबस टोमणे सुरू झाले. त्यात वर्ष झाले तरी मूल होत नाही म्हणून जादूटोण्याचा आधार सासरच्या मंडळींनी घेतला. यामध्ये तिला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. रोज नवनवीन बाबांच्या हातून मारझोड, तंत्रमंत्राचा पाढा यामुळे ती आणखीनच खचून गेली. जादूटोण्यानेही काहीच न झाल्याने आजिमने तिला तिहेरी तलाक देत घराबाहेर काढले.हुंडाबळी, जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा-या प्रकरणात पती आजिम शेख, सासू फरहज सुलताना शेख, सासरे रफी शेख, मोठी जाऊ अमरिन वसी शेख, दीर वसी शेख, इरफान मौलाना या मंडळींविरुद्ध हुंडाबळी तसेच जादूटोणा कायद्यांतर्गत ११ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकMumbaiमुंबई