शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

दिवंगत नेत्यांना विधिमंडळात श्रद्धांजली

By admin | Updated: December 8, 2015 01:34 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे हे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या ज्ञानाचा लाभ सभागृहासह सर्वच सदस्यांना झाला,

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे हे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या ज्ञानाचा लाभ सभागृहासह सर्वच सदस्यांना झाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत आपली शोक संवेदना व्यक्त केली.विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्यासह राम कापसे,माजी राज्यपाल ओम प्रकाश मेहरा,मणिपूरचे राज्यपाल, तसेच माजी विधानसभा सदस्य, माजी मंत्री डॉ. सय्यद अहमद, माजी मंत्री मदन विश्वनाथराव पाटील, विधानसभा सदस्य मोहनराव पांडुरंग गुदगे, अमृतराव गंगाराम राणे, रामजी महादू वरठा, भगवानशहा जीवनशहा मसराम, बाबुराव महादेव नरके, निवृत्तीराव भिकाजी गायधनी यांच्या निधनाबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार, शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे,समाजवादी पार्टीतर्फे अबु आजमी यांनी तर शेतकरी कामगार पक्षातर्फे धैर्यशील पाटील, माकपतर्फे जीवा पांडू गावित यांच्यासह पतंगराव कदम, संजय केळकर, योगेश घोलप यांनीही आपली शोकसंवेदना व्यक्त केली. शेवटी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यंनी दिवगंत सदस्यांच्या निधनानिमित्त आपली शोकसंवेदना व्यक्त केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत या नेत्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. या नेत्यांनी नेहमी जनतेलाच डोळ्यासमोर ठेवून कामे केली व राज्याला नवीन ओळख दिली होती. यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री दीपक सावंत, शरद रणपिसे, जयंत पाटील, प्रभाकर घाडगे, जोगेंद्र कवाडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)