शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराअभावी आदिवासीची आत्महत्या

By admin | Updated: March 14, 2016 02:27 IST

घरात खायला अन्न्नाचा कण नाही आणि रोजगार हमी योजना असूनही रोजगार मिळत नसल्याने विवंचनेला त्रासून तीन दिवसांपूर्वीच जाळून घेतलेल्या आपटाळे गावातील एका आदिवासीचा मृत्यू झाला

हुसेन मेमन,  जव्हारघरात खायला अन्न्नाचा कण नाही आणि रोजगार हमी योजना असूनही रोजगार मिळत नसल्याने विवंचनेला त्रासून तीन दिवसांपूर्वीच जाळून घेतलेल्या आपटाळे गावातील एका आदिवासीचा मृत्यू झाला आहे. सुरेश निकुळे (३२) असे या आदिवासीचे नाव असून निकुळे कुटुंबाच्या रोजगार हमी योजनेच्या जॉबकार्ड वर २००७-०८ पासून आजपर्यंत कसल्याही रोजगाराची नोंद नसल्याचे आढळून आले आहे.जव्हारपासून (जि़ पालघर) अवघ्या आठ किमीच्या अंतरावर ७०० लोकवस्तीच्या आपटाळे गावातील सुरेश निकुळे (३२) या आदिवासीने १० मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घरात स्वत:ला जाळून घेतले. पत्नीला बाहेर काढून आतून दरवाजा बंद केलेला असल्याने त्यांना वाचविण्यास उशीर झाला व ते ९० टक्के भाजले. मात्र रुग्णालयात न्यायला कसलीच मदत मिळाली नाही. सकाळी अंगणवाडी सेविकेने रु ग्णावाहीकेला फोन केल्यावर त्यांना उपचारासाठी जव्हार कुटीर रु ग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पत्नी वंदना निकुळे यांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुले असा परिवार उघड्यावर पडला आहे .रोजगाराच्या शोधात इतरत्र फिरूनही आठवड्यातील एखाद्या दिवशीच रोजगार मिळत होता. निकुळे कुटुंबाच्या रोजगार हमीच्या जॉबकार्ड वर २००७-०८ पासून आजतागायत कसल्याही रोजगाराची नोंद नाही. ग्रामपंचायतीने रोजगाराची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला होता पण काहीच कार्यवाही झाली नाही. कृषी, ग्रामपंचायत, तहसील अशा कोणत्याच यंत्रणेचे काम या गावापर्यंत पोहचलेच नाही. तर आदिम जमातीला घरकुल योजना लागू असतानाही त्यांना लाभ मिळाला नव्हता. घरात एक पातेले, तांब्या आणि भाकरी थापायला तवा इतकेच सामान आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा यांच्या मतदारसंघातच ही आत्महत्या घडल्याने संताप व्यक्त होत आहे.या घटनेनंतर राजकारणही सुरू झाले असून सरकारी यंत्रणा न पोहोचल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी कुटुंबाची भेट घेऊन जीवनावश्यक वस्तूंबरोबरच रोख रकमेची मदत केली. निकुळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जवाबदारी घेऊ व मृत सुरेश यांच्या पत्नीला रोजगार देऊ असे जाहीर केले.